मुंबई, 22 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यातील पहिल्या टी-20 लढतीमध्ये न्यूझीलंडनं खराब सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियासमोर 185 रनचं आव्हान उभ केलं. पहिल्यांदा बॅटींग करताना न्यूझीलंडची अवस्था 3 आऊट 19 अशी झाली होती. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Willamson) देखील आऊट झाल्यानं टीम संकटात सापडली होती.
Sams again - and this time it's the big wicket of Williamson!
New Zealand are 3-19 after four overs in game one #NZvAUS — cricket.com.au (@cricketcomau) February 22, 2021
डेव्हन कॉनवेनं (Deven Conway) न्यूझीलंडला या संकटातून बाहेर काढलं. त्याच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडनं चांगला स्कोअर उभा केला. पण तो मात्र दुर्दैवी ठरला. कॉनवे अखेर 99 रनवर नॉट आऊट राहिला. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकवण्यास त्याला फक्त एक रन कमी पडला.
Devon Conway finishes on 99*!
He powers the Blackcaps to finish on 5-184 #NZvAUS Scorecard: https://t.co/pxsTbX2PyW pic.twitter.com/Oz7Rz5oGTh — cricket.com.au (@cricketcomau) February 22, 2021
भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर डेव्हननं न्यूझीलंडला परत मॅचमध्ये आणलं. त्यानं फक्त 59 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 99 रन काढले.
अश्विननं घेतली फिरकी!
न्यूझीलंडला संकटातून बाहेर काढणाऱ्या डेव्हनच्या या इनिंगचे क्रिकेट विश्वातही पडसाद उमटले आहेत. भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं 'डेव्हन कॉनवे तुला फक्त चार दिवस उशीर झाला.' असं ट्विट करत त्याची फिरकी घेतली आहे. चार दिवसांपूर्वी भारतामध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्यापूर्वी त्यानं ही खेळी केली असती, तर त्याला चांगला भाव मिळाला असता असा या ट्विटचा संदर्भ आहे.
Devon Conway is just 4 days late, but what a knock 👏👏👏 #AUSvNZ
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 22, 2021
डेव्हन कोव्हेनच्या जबरदस्त ट्वीट इतकंच, अश्विनचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. 185 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली असून त्यांचे पहिले चार बॅट्समन झटपट आऊट झाले. आयपीएलमधील लिलावात मोठा भाव मिळालेला ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) फक्त 1 रन काढून आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India, IPL 2021, Ipl 2021 auction, New zealand, R ashwin, Sports