जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK : विराट कोहलीच्या भवितव्यावर आफ्रिदीचं 5 शब्दांमध्ये उत्तर, म्हणाला...

IND vs PAK : विराट कोहलीच्या भवितव्यावर आफ्रिदीचं 5 शब्दांमध्ये उत्तर, म्हणाला...

IND vs PAK : विराट कोहलीच्या भवितव्यावर आफ्रिदीचं 5 शब्दांमध्ये उत्तर, म्हणाला...

IND vs PAK : सध्या अजिबात फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) भवितव्यावर शाहिद आफ्रिदीनं 5 शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 22 ऑगस्ट : भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप स्पर्धेतील मॅचचं  (India-Pakistan Asia Cup clash) काऊंटडाऊन आता सुरू झालंय. या मॅचमध्ये कोण जिंकणार? याबाबत अनेक जण भाकित व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट या स्पर्धेत तळपणार का? हा देखील क्रिकेट विश्वाला मोठा प्रश्न आहे. विराटनं आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये शतक झळकावून आता 1000 दिवस उलटले आहेत.  त्यामुळे विराटचं भविष्य काय असेल? हा प्रश्न पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) विचारण्यात आला. त्या प्रश्नावर त्यानं पाच शब्दांमध्ये उत्तर दिलंय. काय म्हणाला आफ्रिदी? विराट कोहलीचं भवितव्य काय ? असा प्रश्न आफ्रिदीला सोशल मीडियावर विचारला होता. त्यावर आफ्रिदीनं त्याचं भवितव्य हे त्याच्याच हातामध्ये आहे. (It’s in his own hands.) असं 5 शब्दामध्ये उत्तर दिलंय, आफ्रिदीला विचारलेल्या आणखी एका प्रश्नात, कोहली त्याच्या सेंच्युरीचा दुष्काळ कधी संपवेल, याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा “फक्त कठीण काळातच मोठ्या खेळाडूंबद्दल कळू शकतं,” असं उत्तर त्यानं  दिलं.

    जाहिरात

    28 ऑगस्ट रोजी आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मॅच खेळणार आहे. विराट कोहली पाच आठवड्यांच्या विश्रांतीनंतर या मॅचमधूनच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येणार आहे. कोहली इंग्लंड (England) दौऱ्यात शेवटचा खेळला होता, त्यानंतर कोहलीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला. तो भारताच्या वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यात टीममध्ये नव्हता. पाकिस्तानविरोधात होणाऱ्या मॅचमध्ये विराट हा टीममधील महत्त्वाचा खेळाडू असेल. या मॅचमध्ये त्याचं कौशल्य आणि अनुभव भारतीय टीमसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. पाच आठवड्यांनंतर टीममध्ये परतल्यावर विराटच्या फॉर्ममध्ये काय फरक पडला आहे, ते या मॅचमधूनच कळेल. Asia Cup 2022: पाकिस्तानचा हा फलंदाज तुफान फॉर्ममध्ये, दहा वन डेत 4 शतकं 5 अर्धशतकं 28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये भारताची आशिया कपमधील ओपनिंग मॅच पाकिस्तानशी होणार आहे. याच ठिकाणी भारत आणि पाकिस्तान टीमने शेवटची मॅच खेळली होती. टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये बाबर आझम आणि टीमने भारताला 10 विकेट्सने हरवून इतिहास रचला होता. त्यानंतर आता 28 तारखेला या दोन्ही टीम समोरासमोर येणार आहेत. तेव्हा कोण जिंकेल, याकडे प्रेक्षकांसह क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात