मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes: स्टिव्ह स्मिथने एकाच वेळी तोडले 3 दिग्गजांचे रेकॉर्ड आता विराट निशाण्यावर

Ashes: स्टिव्ह स्मिथने एकाच वेळी तोडले 3 दिग्गजांचे रेकॉर्ड आता विराट निशाण्यावर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅशेस सीरिजवर ऑस्ट्रेलियन टीमनं वर्चस्व गाजवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) सिडनी टेस्टच्या चौथ्या दिवशी नवा रेकॉर्ड केला आहे.

पुढे वाचा ...

सिडनी, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅशेस सीरिजवर ऑस्ट्रेलियन टीमनं वर्चस्व गाजवलं आहे. या सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट जिंकत यजमान टीमनं यापूर्वीच सीरिज जिंकली आहे. त्यानंतर सिडनीमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) सिडनी टेस्टच्या चौथ्या दिवशी नवा रेकॉर्ड केला आहे.

स्मिथनं सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 67 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 23 रन काढले. याबरोबरत त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन काढणाऱ्या बॅटरच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचे बॅटींग कोच जस्टीन लँगर, इंग्लंडचा माजी कॅप्टन माईक अर्थटन आणि दिग्गज बॅटर इयान बेलला मागे टाकले आहे. आता स्मिथच्या निशाण्यावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आहे.

स्मिथनं 81 टेस्टमध्ये 61 च्या सरासरीनं 7739 रन काढले आहेत. यामध्ये 27 शतक आणि 33 अर्धतकांचा समावेश आहे. त्याने सिडनी टेस्टमध्ये लँगर (7696), बेल (7727) आणि अर्थटन (7728) यांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी 100 पेक्षा जास्त टेस्टमध्ये हे रन केले आहेत. भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं 98 टेस्टमध्ये 27 शतकांसह 7854 रन काढले आहेत. स्मिथचा सध्याचा फॉर्म पाहता तो लवकरच शतक आणि रनच्या बाबतीत विराटला मागे टाकू शकतो.

ख्वाजाची दमदार कामगिरी

सिडनी टेस्टच्या चौथ्या ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) शतक झळकावलं. ख्वाजनं यापूर्वी पहिल्या इनिंगमध्येही शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या इनिंगमध्येही शंभरी पार करण्याचा विक्रम केला आहे. अ‍ॅशेस सीरिजमधील दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावणारा ख्वाजा हा सहावा ऑस्ट्रेलियन आहे. त्याच्या शतकामुळे सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीमध्ये आहे.

Match Fixing: पाकिस्तान दौऱ्यातील घटनेचा शेन वॉर्ननं केला खुलासा, 28 वर्षांनंतर सांगितला 'तो' किस्सा

ख्वाजाने 131 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने शतक झळकावले. पहिल्या इनिंगमध्ये 137 रन काढणाऱ्या ख्वाजाने दुसऱ्या इनिंगमध्येही आत्मविश्वासानं बॅटींग करत इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेतला. त्याने कॅमेरून ग्रीन सोबत पाचव्या विकेटसाठी 179 रनची भागिदारी केली. ख्वाजनं झळकावलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 388 रनचे टार्गेट ठेवले आहे.

First published:

Tags: Ashes, Australia, Cricket