मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे टेस्टमधील (Boxing Day Test) पहिल्या दिवशी इंग्लंडनं पुन्हा एकदा निराशा केली आहे. ऑस्ट्रेलियन अटॅकचा निर्धारानं सामना करण्यात इंग्लंडचे बॅटर्स अपयशी ठरले. इंग्लंडची पहिली इनिंग पहिल्याच दिवशी 185 रनवर ऑल आऊट झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय दिला. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं दुसरी टेस्ट खेळू न शकलेल्या कमिन्सनं भेदक बॉलिंग केली. त्याने पहिल्याच सेशनमध्ये इंग्लंडला तीन धक्के दिले. त्यामुळे पाहुण्या टीमची लंचपर्यंत अवस्था 3 आऊट 61 अशी होती.
England head to Lunch at 61/3 on Day 1 of the Boxing Test.
— ICC (@ICC) December 26, 2021
Pat Cummins has dismissed all three batters.
Watch the #Ashes live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#AUSvENG | #WTC23 | https://t.co/QKpJv6yy6n pic.twitter.com/etHkz2LVuJ
लंचनंतर मिचेल स्टार्कनं इंग्लंडला जोरदार धक्का दिला. त्याने जो रूटचा अडथळा दूर केला. रूटने 50 रन केले. यावर्षी फॉर्मात असलेला रूट आऊट झाल्यानंतर इंग्लंडचे अन्य बॅटर्स फार प्रतिकार करू शकले नाहीत. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरले. तर या सीरिजमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोनं थोडा प्रतिकार करत 35 रन काढले.
A terrific performance from Australia as they bowl out England for 185.
— ICC (@ICC) December 26, 2021
Pat Cummins and Nathan Lyon finish with three wickets each.
Watch the #Ashes live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#AUSvENG | #WTC23 pic.twitter.com/n51J9IIdVn
ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं ठराविक अंतरानं विकेट्स घेतल्यानं मोठी पार्टनरशिप करण्यात इंग्लंडला अपयश आले. त्यांची संपूर्ण टीम 200 चा टप्पाही ओलांडू शकली नाही. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्कनं 2 विकेट्स घेतल्या. स्कॉट बोलंड आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. IND vs SA, AUS vs ENG: 26 डिसेंबरला सुरू होणाऱ्या मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट का म्हणतात? जाणून घ्या कारण पाच टेस्टच्या अॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडची टीम सध्या 0-2 ने पिछाडीवर आहे. ही सीरिज वाचवण्यासाठी इंग्लंडला आता एकही टेस्ट गमावून चालणार नाही. या टेस्टसाठी इंग्लंडनं चार तर ऑस्ट्रेलियानं 2 बदल केले आहेत.

)







