सिडनी, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हा सध्या क्रिकेट विश्वातील आघाडीचा बॅटर आहे. स्मिथने 81 टेस्टमध्ये 61 च्या सरासरीनं 7739 रन काढले आहेत. यामध्ये 27 शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने सिडनी टेस्टमध्ये लँगर (7696), बेल (7727) आणि अर्थटन (7728) यांना मागे टाकले आहे. विराट कोहलीपेक्षा 17 टेस्ट कमी खेळून विराट इतकेच शतक स्मिथच्या नावावर आहेत.
स्मिथची क्रिकेट विश्वात सर्वोत्तम बॅटर म्हणून ओळख असली तरी त्या कारकिर्दीची सुरूवात लेग स्पिनर म्हणून केली होती. हे आता अनेकांच्या लक्षात नसेल. स्मिथ ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये लेगस्पिनर म्हणून आला. त्याने त्यानंतर हळहळू बॅटींगचे कौशल्य दाखवण्यास सुरूवात केली आज तो ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॅटर बनला असून अगदी क्वचित बॉलिंग करतो.
सिडनी टेस्टच्या शेवटच्या टप्प्यात 3 ओव्हर्सचा खेळ शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सला (Pat Cummins) स्टीव्ह स्मिथच्या बॉलिंगची आठवण आली. त्याने स्मिथकडे बॉल दिला. स्मिथने लगेच जॅक लीच या चिवटपणे खेळणाऱ्या इंग्लंडच्या बॅटरला आऊट केले. स्मिथने यापूर्वी 2016 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट घेतली होती. त्यानंतर पाच वर्षांनी त्याला विकेट मिळाली.
"Can he just get something to explode out of the footmark? That's what he's trying to do, he's getting it wide outside the off stump, catch a footmark...
"About there! ABOUT THERE!" - Ricky Ponting STEVE SMITH WICKET #Ashes pic.twitter.com/5w5ZjZE58J — 7Cricket (@7Cricket) January 9, 2022
कॅप्टन कमिन्सने मॅचची शेवटची ओव्हर देखील पुन्हा एकदा स्मिथला दिली होती. स्मिथने त्या ओव्हरमध्ये अँडरसनला आऊट करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण त्याचे हे प्रयत्न अपुरे ठरले. अँडरसनं संपूर्ण ओव्हर खेळून काढत सिडनी टेस्ट ड्रॉ केली. स्मिथला शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नसली तरी बॉलिंगमधील प्रयत्नांमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Ashes: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये झाली जोरदार लढत, टेस्ट क्रिकेटचा थरार पाहून फॅन्स खूश
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Australia, Cricket, England, Steven smith