Home /News /sport /

Ashes: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये झाली जोरदार लढत, टेस्ट क्रिकेटचा थरार पाहून फॅन्स खूश

Ashes: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये झाली जोरदार लढत, टेस्ट क्रिकेटचा थरार पाहून फॅन्स खूश

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या तीन टेस्ट अगदीच एकतर्फी झाल्या होत्या. त्यानंतर सिडनीमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी टेस्ट क्रिकेटचा थरार पाहयला मिळाला.

    सिडनी, 9 जानेवारी : अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या तीन टेस्ट अगदीच एकतर्फी झाल्या होत्या. त्यानंतर सिडनीमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी टेस्ट क्रिकेटचा थरार पाहयला मिळाला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी टीमनं शेवटच्या बॉलपर्यंत या टेस्टमध्ये लढा दिला. ऑस्ट्रेलियाने ही टेस्ट जिंकण्यासाठी जंग-जंग पछाडले. इंग्लंडचे 9 विकेट्स त्यांनी घेतल्या. पण, इंग्लंडची शेवटची जोडी त्यांना फोडता आली नाही. सिडनी टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडला 388 रनची गरज होती. पाचव्या दिवशी टेस्ट ड्रॉ करणे हेच इंग्लंडचे धोरण होते. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी ठराविक अंतराने विकेट्स घेत इंग्लंडवर दबाव कायम ठेवला. जॉनी बेअरस्टो हा इंग्लंडचा शेवटचा बॅटर आऊट झाला त्यावेळी 10 ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 2 विकेट्स आवश्यक होत्या. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने (Pat Cummims) त्यावेळी स्पिन बॉलर्सचा अटॅक सुरू केला. जॅक लीच आणि स्टुअर्ट ब्रॉड ही जोडी फोडण्यासाठी कमिन्सने विकेट किपरसह 9 फिल्डर बॅटरच्या अगदी जवळ उभे केले होते. त्या घटनेवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.  क्रिकेट फॅन्सपासून ते टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरपर्यंत (Wasim Jaffer) अनेकांनी या मॅचबाबत प्रतिक्रिया देताना टेस्ट क्रिकेटची प्रशंसा केली आहे. स्टीव्ह स्मिथ शेवटची ओव्हर टाकायला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 1 विकेट हवी होती. जेम्स अँडरसन (James Anderson) हा 11 व्या क्रमांकाचा बॅटर त्यावेळी समोर होता. स्मिथच्या प्रत्येक बॉलनंतर इंग्लंडच्या ड्रेसिग रूममधील सर्वांचे चेहरे बदलत होते. जेम्स अँडरसनने शेवटची ओव्हर शांतपणे खेळून काढत सिडनी टेस्ट ड्रॉ केली. अर्थात या टेस्टच्या निकालाचा अ‍ॅशेस सीरिजवर काहीही परिणाम होणार नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन टेस्ट जिंकत सीरिज यापूर्वीच खिशात टाकली आहे. सिडनी टेस्टमध्ये T20 चा थरार, शेवटच्या ओव्हरमध्ये लागला निकाल
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, England

    पुढील बातम्या