सिडनी, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये टी20 सारखा थरार रंगला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेली ही टेस्ट अखेर ड्रॉ झाली आहे. अॅशेस सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट एकतर्फी गमावल्यानंतर इंग्लंडने सिडनी टेस्टमध्ये पराभव टाळण्यात यश मिळवले. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि जेम्स अँडरसनच्या (James Anderson) जोडीने शेवटच्या ओव्हर खेळत इंग्लंडचा पराभव टाळला. इंग्लंडला विजयासाठी 388 रनचे टार्गेट होते. पाचव्या दिवशी हे टार्गेट गाठण्यापेक्षा संपूर्ण दिवस खेळून काढण्यावर इंग्लिश बॅटर्सनी भर दिला. ओपनर झॅक क्राऊलीने (Zak Crawley) 77 रनची खेळी केली. कॅप्टन जो रूट (Joe Root) 24 रन काढून आऊट झाल्यानंतर इंग्लंडची टीम संकटात आली होती. त्यानंतर बेन स्टोक्स (Ben Stokes) अर्धशतक झळकावत इंग्लंडची इनिंग लांबवली. स्टोक्स 60 रन काढून आऊट झाला. स्टोक्स आऊट झाल्यानंतर पहिल्या इनिंगमधील शतकवीर जॉनी बेअरस्टोनं प्रतिकार केला. तो आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ आले होते. त्यावेळी जॅक लीच आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीनं चिवट प्रतिकार केला. स्टीव्ह स्मिथला बॉलिंग देण्याची कमिन्सची चाल यशस्वी ठरली. स्मिथने लीचला आऊट केले. त्यावेळी दोन ओव्हर शिल्लक होत्या.
Match drawn 🏏
— ICC (@ICC) January 9, 2022
A riveting game comes to an end as England survive with one wicket remaining 👏#WTC23 | #Ashes pic.twitter.com/qrTwtoZMwp
स्टीव्ह स्मिथ शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा जेम्स अँडरसन त्याच्या समोर होता. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कमिन्सने सर्व फिल्डर्स जवळ लावत दबाव वाढवला होता. पण अँडरसननं संपूर्ण ओव्हर शांतपणे खेळत टेस्ट ड्रॉ केली. ऑस्ट्र्लियाने अॅशेस सीरिज यापूर्वीच जिंकली आहे. अखेर इंग्लंडला सीरिजमधील चौथी टेस्ट ड्रॉ करत व्हाईट वॉश टाळण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडनं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तर जॉनी बेअरस्टोनं शतक झळकावलं. त्याचबरोबर बेन स्टोक्सनं दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंतला ब्रेक द्या, तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या माजी कोचची मागणी