ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ट्रेव्हिस हेडच्या (Travis Head) शतकाच्या जोरावर 303 रन केले होते. त्याला उत्तर देताना इंग्लंडची पहिली इनिंग 188 रनवरच संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 115 रनची आघाडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्या इनिंगमध्ये फार कमाल करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट किपर अॅलेक्स कॅरीने सर्वात जास्त 49 रन केले. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री झाली Rowdy Baby तुम्ही पाहिला का VIDEO? इंग्लंडला विजयासाठी 271 रनचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनर्सनी चांगली सुरूवात केली असून त्यांनी 50 रनचा टप्पा एकही विकेट न गमावता पूर्ण केला आहे. होबार्ट टेस्टचा हा तिसराच दिवस आहे. त्यामुळे इंग्लंडला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भरपूर कालावधी शिल्लक आहे. अॅशेस सीरिज ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच जिंकली आहे. आता शेवटची टेस्ट जिंकून रिकाम्या हाताने मायदेशी जाण्याची नामुश्की टाळता येईल.Career-best figures for Mark Wood - that's the third five-wicket haul of his Test career! #Ashes | @VodafoneAU pic.twitter.com/XS94VFozGE
— cricket.com.au (@cricketcomau) January 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.