Home /News /sport /

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री झाली Rowdy Baby तुम्ही पाहिला का VIDEO?

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री झाली Rowdy Baby तुम्ही पाहिला का VIDEO?

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. धनश्रीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  मुंबई, 16 डिसेंबर : टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. धनश्री तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यावरील डान्सचे अनेक व्हिडीओ तिने आजवर शेअर केले आहेत. आता ती टॉलीवूडच्या गाण्यावरही व्हिडीओ करत असून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहेत. धनश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती धनूषच्या 'राऊडी बेबी' (Rowdy Baby) या गाण्यावर डान्स करत आहे. तामिळ सिनेमा मारी-2 या चित्रपटातील हे गाणे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक बालाजी मोहन आहे. मुळ गाण्यात धनूष आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांनी जबरदस्त डान्स केला असून त्यामुळे हे गाणे चांगलेच लोकप्रिय आहे.
  धनश्रीच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून ते मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहेत. धनश्रीसोबत या व्हिडीओत आणखी एक कलाकार असून त्याचे नाव रवी आहे. धनश्रीनं यापूर्वी पुष्पा सिनामातील  सामी-सामी या गाण्यावरही डान्स केला होता.
  युजवेंद्र चहल सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. चहलची वन-डे मालिकेसाठी निवड झालेली आहे. तीन सामन्याची ही मालिका 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. AUS Open 2022: जोकोविचची शेवटची आशा देखील समाप्त, ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी निश्चित
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram, Video Viral On Social Media, Yuzvendra Chahal

  पुढील बातम्या