मुंबई, 31 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस सीरिजभोवती (Ashes Series) कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. इंग्लंड टीमच्या कॅम्पमधील 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये इंग्लंडचे हेड कोच ख्रिस सिल्वरवूड ( Chris Silverwood) यांच्या कुटुंबातील सदस्याचा समावेश आहे. त्यामुळे इंग्लिश टीमला सिडनी टेस्ट कोचशिवाय खेळावी लागेल. इंग्लंडची टीम कोरोनामुळे अडचणीत आलेली असतानाच ऑस्ट्रेलियन टीममध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा बॅटर ट्रेव्हिस हेड (Travis Head) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. खेळाडूंच्या होणाऱ्या नियमित PCR टेस्टमध्ये हेडला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाले. त्यामुळे हेड आता सिडनी टेस्ट खेळणार नाही. ऑस्ट्रेलियानं अॅशेस सीरिज यापूर्वीच जिंकली आहे. त्यामुळे हेडच्या अनुपस्थितीचा त्यांना मोठा धक्का बसणार नाही. तरीही त्याची कमतरता नक्कीच जाणवू शकते. हेड या सीरिजमध्ये सर्वात जास्त रन करणारा बॅट आहे. त्यानं 3 टेस्टमधील 4 इनिंगमध्ये 248 रन केले आहेत. त्यामध्ये ब्रिस्बेन टेस्टमधील 152 रनच्या इनिंगचा समावेश आहे.
Cricket Australia has confirmed Travis Head has tested positive to Covid-19 following a routine PCR test.
— ICC (@ICC) December 31, 2021
Mitchell Marsh, Nic Maddinson and Josh Inglis have joined the Australian #Ashes squad as additional cover. pic.twitter.com/zyl4j1CZcZ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील इंग्लंड कॅम्पमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता सात झाली आहे. यापैकी तीन जण सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. तर चार जण कुटुंबातील सदस्य आहेत. मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी झालेल्या टेस्टमध्ये त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. दोन्ही देशांचे खेळाडू शुक्रवारी सिडनीसाठी रवाना होतील. सिडनी टेस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच होईल असा विश्वास ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियानं’ व्यक्त केला आहे. VIDEO: 20 व्या मजल्यावर तासभर अडकला स्मिथ, लाबुशेननं केली वाचवण्यासाठी धावाधाव दरम्यान मॅच रेफ्री डेव्हिड बून देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानं सिडनी टेस्टमधून बाहेर पडले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आयसीसीच्या इंटरनॅशनल पॅनलमधील रेफ्री स्टीव्ह बर्नाड सिडनी टेस्टमध्ये जबादारी सांभाळतील.