मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /VIDEO: 20 व्या मजल्यावर तासभर अडकला स्मिथ, लाबुशेननं केली वाचवण्यासाठी धावाधाव

VIDEO: 20 व्या मजल्यावर तासभर अडकला स्मिथ, लाबुशेननं केली वाचवण्यासाठी धावाधाव

ऑस्ट्रेलियन टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथसोबत (Steve Smith) मेलबर्नमधील हॉटेलमध्ये एक विचित्र घटना घडली. या घटनेची कल्पना कोणत्याही सदस्यांनी केली नसेल.

ऑस्ट्रेलियन टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथसोबत (Steve Smith) मेलबर्नमधील हॉटेलमध्ये एक विचित्र घटना घडली. या घटनेची कल्पना कोणत्याही सदस्यांनी केली नसेल.

ऑस्ट्रेलियन टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथसोबत (Steve Smith) मेलबर्नमधील हॉटेलमध्ये एक विचित्र घटना घडली. या घटनेची कल्पना कोणत्याही सदस्यांनी केली नसेल.

मुंबई, 31 डिसेंबर : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमनं अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series) जोरदार कामगिरी करत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता या सीरिजमधील चौथी टेस्ट सिडनीमध्ये होणार आहे. या टेस्टच्या तयारीमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमसोबत मेलबर्नमधील हॉटेलमध्ये एक विचित्र घटना घडली. या घटनेची कल्पना कोणत्याही सदस्यांनी केली नसेल.

ऑस्ट्रेलियन टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) मेलबर्नमधील हॉटेलच्या 20 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये अडकला होता. स्मिथनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यानं टीममधील सहकारी मार्नस लाबुशेनची (Marnus Labuschagne) मदत मागितली. लाबुशेननं स्मिथला लिफ्टमधून बाहेर काढण्यासाठी चांगलीच धावाधाव केली.

लाबुशेननं या घटनेच्या व्हिडीओचं लाईव्ह स्ट्रिमिंग केले. त्यामध्ये तो एका रॉडच्या मदतीनं लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय. त्याने यावेळी स्मिथला काही चॉकलेट देखील दिले. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी येऊन स्मिथची सुटका केली. या दरम्यान स्मिथ सुमारे 55 मिनिटे लिफ्टमध्ये अडकला होता.  स्मिथ लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममधील सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्मिथचे स्वागत केले.

स्मिथनं हा सर्व अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. 'मी माझ्या मजल्यावर आलो आहे, पण दरवाजा उघडत नाहीय. मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूने तो उघडलाय. मार्नस लाबुशेन दुसऱ्या बाजूनं तो उघडण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याचा काही फायदा झाला नाही. मी विचार केला होता तशी ही संध्याकाळ नाही.'  असे स्मिथने म्हंटले आहे.

सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, खेळाडूंनी लगावले ठुमके! VIDEO

हॉटेलमध्ये परतल्यानंतर स्मिथनं सांगितलं की, 'मी रूमवर सुरक्षित परतलो आहे. मला लिफ्टमधून बाहेर काढण्यात आलंय. हा एक विशेष अनुभव होता. ते 55 मिनिटं मला पुन्हा कधीही मिळणार नाहीत.'

First published:
top videos

    Tags: Australia, Steven smith, Video viral