ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन टीममधील मुस्लीम खेळाडू आहे. धार्मिक कारणांमुळे तो दारूपासून दूर असतो. या कारणामुळे तो टीम आनंद साजरा करत असतानाही एकटा लांब होता. ऑस्ट्रेलियन कॅप्टनचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने तातडीने टीममधील खेळाडूंना शँपेन उडवणे थांबवण्यास सांगितले. त्यामुळे ख्वाजालाही सर्वांमध्ये सहभागी होता आले. मार्नस लाबुशेननं ख्वाजाला स्टेजवर बोलावले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जडेजानंतर सूर्या आणि इशान किशन Pushpa च्या गाण्यावर थिरकले, पाहा VIDEO त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने होबार्टमध्ये झालेली या मालिकेतील पाचवी आणि शेवटची टेस्ट 146 रनने जिंकली. इंग्लंडला ही मॅच जिंकण्यासाठी 271 रनचे आव्हान होते. त्यांची संपूर्ण टीम 124 रनवरच ऑल आऊट झाली. पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार मिळाला.Pat Cummins realizing that Khawaja had to stand away because of the alcohol so he tells his team to put it away and calls Khawaja back immediately. A very small but a very beautiful gesture❤️pic.twitter.com/KlRWLprbWM
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) January 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Australia, Video viral