मुंबई, 17 जानेवारी : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादव (Suyrakumar Yadav) आणि इशान किशन देखील (Ishan Kishan) या टीमसोबत आहेत. 19 जानेवारीपासून वन-डे मालिका (India vs South Africa) सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी हे दोघेही धमाल मस्तीच्या मूडमध्ये आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ (Pushpa : The Rise) या अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सिनेमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. हा सिनेमा भारतीय खेळाडूंमध्येही लोकप्रिय झाला आहे. सूर्यकूमार यादव आणि इशान किशन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये हे दोघे अल्लू अर्जुनच्या स्टाईलने पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाण्यावर नाच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी देखील या सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. धवन देखील टीम इंडियासोबत आफ्रिकेत आहे. तर जडेजा दुखापतीमुळे आफ्रिकेला जाऊ शकला नाही.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) या मालिकेत टीम इंडियाचा कॅप्टन आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व्हाईस कॅप्टन आहे. आयर्लंडने रचला इतिहास, वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला खळबळजनक निकाल विराट कोहलीसाठी (Virat Kohli) ही महत्त्वाची मालिका आहे. विराटने काही दिवसांपूर्वीच टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली आहे. तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून त्याला हटवण्यात आले आहे. आता खेळाडू म्हणून मोठ्या कालावधीनंतर तो एखाद्या आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळणार आहे.