मुंबई, 5 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलियाचे हेड कोच जस्टीन लँगरने (Justin Langer) पदाचा राजीनामा दिला आहे. लँगरचा कार्यकाळ जून महिन्यापर्यंत होता. त्यापूर्वीच त्याने राजीनामा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी झालेल्या दीर्घ बैठकीनंतर त्याने ही घोषणा केली. लँगरच्या राजीनाम्यानंतर पुढील कोच कोण असेल? या प्रश्नाचं उत्तरही ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं शोधलं आहे. ऑस्ट्रेलियाची टीम लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन टीमच्या हंगामी कोचची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे हंगामी हेड कोच म्हणून अॅण्ड्रयू मॅकडोनाल्डची (Andrew Mcdonald) नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ट्विट करत ही माहिती दिली आहे. मॅकडोनाल्ड यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे असिस्टंट कोच होते. त्यांचे एकप्रकारे प्रमोशन झाले आहे.
JUST IN: @CricketAus confirms Andrew McDonald has been appointed interim head coach of the Aussie men's team. More to come.
— cricket.com.au (@cricketcomau) February 5, 2022
मॅकडोनाल्डची कारकिर्द मॅकडोनाल्डने यापूर्वी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमचे हेड कोच म्हणून काम केले आहे. पण त्यांना एकाच सिझननंतर निराशाजनक कामगिरीमुळे पदावरून हटवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचे मावळते हेड कोच जस्टीन लँगरच्या तुलनेत त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द साधारण आहे. भारताची पहिल्या वन-डे मध्ये काय होती Playing 11? वाचा 48 वर्षांपूर्वीचा इतिहास मॅकडोनाल्डकडे फक्त 4 टेस्ट खेळण्याचा अनुभव असून त्यामध्ये त्याने 107 रन केले आणि 9 विकेट्स घेतल्या. मॅकडोनाल्ड 2019 पासून जस्टीन लँगरचे असिस्टंट म्हणून ऑस्ट्रेलिया टीमसोबत होते. आता त्यांना नवी जबाबदारी मिळाली आहे. पाकिस्तान दौऱ्यातील कामगिरीनंतरचे मॅकडोनाल्डचे या पदावरील भवितव्य निश्चित होणार आहे.