जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / तालिबान संकटात ICC ची मदत नाही, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचा दावा

तालिबान संकटात ICC ची मदत नाही, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचा दावा

तालिबान संकटात ICC ची मदत नाही, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचा दावा

अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केल्यानंतर (Taliban In Afghanistan) त्या देशातील परिस्थिती बदलली आहे. या सर्वात मोठा त्रास हा कलाकार तसंच खेळाडूंना होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केल्यानंतर (Taliban In Afghanistan)  त्या देशातील परिस्थिती बदलली आहे. या सर्वात मोठा त्रास हा कलाकार तसंच खेळाडूंना होत आहे. तालिबानच्या छळातून वाचण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका फुटबॉलपटूचा विमानातून खाली पडून मृत्यू झाला. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान Afghanistan vs Pakistan) ही क्रिकेट  सीरिज देखील सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या महिला खेळाडूंची अवस्था तर आणखी बिकट आहे. त्यांच्या क्रिकेट टीमची सदस्य रोया शमीम  (Roya Samim) ही दोन बहिणींसह देश सोडून कॅनडामध्ये गेली आहे. सर्व महिला खेळाडूंनी आयसीसीकडं (ICC) मदत मागितली होती, पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असा दावा शमीमनं केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं 25 महिला क्रिकेटपटूंना मागील वर्षी करारबद्ध केले होते. एका ब्रिटीश वृत्तापत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, शमीमनं सांगितलं की, ‘आम्ही सर्व खेळाडूंनी सुरक्षेबाबत आयसीसीला  मेल केला होता. पण आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. ते आम्हाला उत्तर का देत नाहीत? ते आमचं अस्तित्व का मानत नाहीत? त्यांचा आमच्याशी या प्रकारचा व्यवहार का आहे? असे गंभीर प्रश्न शमीमनं उपस्थित केले आहेत. ‘अफगाणिस्तान सोडणे ही माझ्यासाठी सर्वात वाईट घटना होती. माझं सारं काही लुटलं गेलं. नोकरी, क्रिकेट, टीममधील सहकारी, माझं घर, माझे नातेवाईक सर्व काही.  त्या दिवसाची आठवण काढली तरी मला रडू येईल. तालिबान यापूर्वी सत्तेत आला होता तेव्हा त्याने महिलांच्या शिक्षणावर आणि त्यांनी काम करण्यावर बंदी घातली होती. मुलींच्या शिक्षणाच्या विरुद्ध असलेले तालिबान आम्हाला खेळू कसं देतील ? टीममधील अन्य खेळाडू आजही अफगाणिस्तानात आहेत. त्या घाबरलेल्या आहेत. त्या घरात बंद आहेत आणि लोकांकडून मदत मागतायतं. फीफाप्रो संघटनेच्या मदतीनं 77 तरुण एथलिट आणि फुटबॉल टीमच्या सदस्यांना देशाच्या बाहेर काढण्यात आलंय, इतकचं नाही तर 2 पॅरालिम्पिकच्या सदस्यांनाही मदत करण्यात आली. पण महिला क्रिकेटपटूंना सोडून देण्यात आलं. आसा आरोपही शमीमनं केला आहे. IND vs ENG: अजिंक्य रहाणेची होणार हकालपट्टी? सर्वात यशस्वी कॅप्टनला मिळणार नवी जबाबदारी आयसीसीचं स्पष्टीकरण काय? आयसीसीनं मात्र या प्रकारच्या मदतीची मागणी करणारा कोणताही ईमेल आला नसल्याचं उत्तर दिलं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माध्यमातून आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचा दावा आयसीसीनं केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात