नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: सेंट किट्स अॅण्ड नेविस पॅट्रियट्सने (St Kitts and Nevis Patriots) कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) 2021 चा चषक आपल्या नावावर केला आहे. ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखालील सेंट किट्सने सेंट लुसिया किंग्सचा तीन गडी राखून पराभव केला. सेंट लुसिया किंग्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रहकीम कॉर्नवॉल, कीमो पॉल आणि रोस्टन चेजच्या खेळीमुळे लुसिया किंग्स 20 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 159 धावा केल्या होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सेंट किट्सच्या संघानं शेवटच्या चेंडूवर थरारक विजयाची नोंद करत इतिहासात पहिल्यादाच CPLचे विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे.
टॉस जिंकल्यानंतर सेंट लुसियाचा सलामीवीर आंद्रे फ्लेचर आणि रहकीम कॉर्नवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. फवाद अहमदने आंद्रे फ्लेचरला 11 धावांवर बाद केलं. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेला मार्क देयाल खास कामगिरी करू शकला नाही. 1 धाव करून तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कॉर्नवॉल आणि रोस्टन चेजने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. कॉर्नवॉल आणि चेज दोघांनी प्रत्येकी 43 धावांची उत्तम खेळी साकारली.
हेही वाचा-ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी झाली रोहितची फॅन, टीम इंडियाला दिला गंभीर इशारा
लुसिया किंग्सच्या 100 धावांत 5 विकेट्स पडल्यानंतर 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कीमो पॉलने शेवटच्या षटकांत धमाकेदार फलंदाजी केली. पॉलनं 21 चेंडूत पाच सिक्सच्या मदतीने 39 धावा कुटल्या. पॉलच्या खेळीमुळे सेंट लुसिया किंग्स 159 धावाचं लक्ष्य ठेवू शकला आहे.
हेही वाचा-IPL 2021: आता स्टेडियममध्ये होणार प्रेक्षकांचा जल्लोष, BCCI नं जाहीर केला निर्णय
दुसरीकडे, धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर ख्रिस गेलने शून्य रनावर विकेट गमावली. तर एविन लुईसही वहाब रियाझच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर जोशुआ डी सिल्वाने 32 चेंडूत 37 धावा आणि शेरफेन रदरफोर्डने 22 चेंडूत 25 धावांची खेळी करत संघाला सावरलं. हे दोघं बाद झाल्यावर ब्राव्हो देखील फार चांगली कामगिरी करू शकला नाही. 8 धावा करून तोही पव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा-क्रिकेटप्रेमींनो लक्ष द्या! कोरोना लस घेतली असेल तरच पाहता येणार IPL 2021
पण सेंट किट्सने अद्याप हार मानली नव्हती. सेंट किट्स संघाला शेवटच्या 3 षटकांत विजयासाठी 31 धावांची गरज होती आणि त्यांच्या पाच महत्त्वाच्या विकेट्स पडल्या होत्या. अशात डॉमिनिक ड्रेक्स आणि फॅबियन एलन क्रिझवर होते. दोघांनी 18 व्या ओव्हरमध्ये 10 धावा केल्या. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज होती. वहाब रियाजने 19 व्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या पण या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर ऐलन (20) आणि पाचव्या चेंडूवर शेल्डन कॉटरेल धावबाद केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये सेंट किट्सला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज होती. अत्यंत अतीतटीच्या सामान्यात शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला ड्रेक्सनं संघाला विजय मिळवून दिला. ड्रेक्सने 24 चेंडूत नाबाद 48 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे सामनावीरचा पुरस्कार त्याला मिळाला तर रोस्टन चेजला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.