Home /News /sport /

IPL 2021: आता स्टेडियममध्ये होणार प्रेक्षकांचा जल्लोष, BCCI नं जाहीर केला महत्त्वाचा निर्णय

IPL 2021: आता स्टेडियममध्ये होणार प्रेक्षकांचा जल्लोष, BCCI नं जाहीर केला महत्त्वाचा निर्णय

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, Phase 2) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. हा टप्पा सुरू होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

     मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, Phase 2) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. हा टप्पा सुरू होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता क्रिकेट फॅन्सना स्टेडियममध्ये उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. बीसीसीआयनं ही घोषणा केली आहे. यापूर्वी कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्यांचे आवडते खेळाडू तसंच टीमला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बीसीसीआयनं याबाबत ट्विट केलं असून त्यामध्ये फॅन्सना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देणार असल्याचं म्हंटलं आहे. आयपीएल मॅचची तिकीटं  www.iplt20.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतील. शोएब अख्तरनं दिला PCB च्या नव्या अध्यक्षांना सल्ला, बाबर आझमवर केलं मोठं वक्तव्य स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना कोव्हिड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारचे नियम पाळण्याची खबरदारी घ्यावी लागेल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी या शहरांमध्ये होतील. यापूर्वी भारतामध्ये या स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला. त्यावेळी 29 सामन्यानंतर आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indian vs Chennai Super Kings) या मॅचनं दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, IPL 2021

    पुढील बातम्या