Home /News /sport /

सचिनच्या मित्रानं लैंगिक शोषण केल्याचा आरोप, क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई

सचिनच्या मित्रानं लैंगिक शोषण केल्याचा आरोप, क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई

सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र अशी ओळख असलेल्या खेळाडूवर महिला क्रिकेटपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

    बडोदा, 22 मार्च : सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र अशी ओळख असलेल्या अतुल बेडाडे याच्यावर महिला क्रिकेटपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळलेला अतुल बेडाडे हा सचिनचा बालपणीचा मित्र आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा केव्हा बडोद्यात सामना खेळला आहे तेव्हा सामन्याआधी किंवा नंतर तो या मित्राला भेटला आहे. आता अतुल बेडाडे अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर बडोद्या महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाची जबाबदारी होती. त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यात लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोपही आहे. याप्रकरणी बडोदा क्रिकेट असोसिएशनने महिला संघाचा प्रशिक्षक अतुल बेडाडे याच्यावर  निलंबनाची कारवाई केली आहे. महिला क्रिकेटपटूंनी अतुलवर लैगिंक शोषण आणि लज्जास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप केला होता. बीसीएनं दिलेल्या माहितीनुसार, महिला खेळाडूंनी फेब्रुवारी महिन्यात हिमाचल प्रदेशात महिला सिनियर वनडे टुर्नामेंटवेळी प्रशिक्षक अतुल बेडाडेविरुद्ध गैरवर्तानाबाबत तक्रार केली होती. क्रिक इन्फोच्या रिपोर्टनुसार, बीसीएच्या वरिष्ठ समितीने प्रशिक्षक बेडाडेवर लागलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अतुल बेडाडेने आपल्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. या आरोपामुळे आश्चर्याचा धक्का बसला असल्याचं त्याने म्हटलं आहे. हे वाचा : IPL रद्द झाल्यास विराटसह 'या' 5 खेळाडूंना बसणार कोट्यवधींचा फटका बेडाडेने भारताकडून 1994 मध्ये 13 एकदिवसीय सामने खेळले होते. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 64 सामने खेळताना 3136 धावा केल्या होत्या. यात 10 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. हे वाचा : टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटूसाठी कोरोना म्हणजे 'वरदान', वाचवणार करिअर
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या