जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 73 वर्षांनी सौराष्ट्रनं जिंकला रणजी करंडक, इतिहास घडवला पण...

73 वर्षांनी सौराष्ट्रनं जिंकला रणजी करंडक, इतिहास घडवला पण...

73 वर्षांनी सौराष्ट्रनं जिंकला रणजी करंडक, इतिहास घडवला पण...

गेल्या आठ वर्षांत चार वेळा रणजी ट्रॉफी फायनल गाठणाऱ्या सौराष्ट्रनं अखेर पहिला रणजी करंडक जिंकला. त्यांची ही ऐतिहासिक कामगिरी पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उपस्थित नव्हते.

  • -MIN READ
  • Last Updated :

राजकोट, 13 मार्च : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात 30 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेल्या बंगालचं स्वप्न भंगला. अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालला पराभूत केलं. सौराष्ट्रनं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली. बंगाल आणि सौराष्ट्र यांच्या सामन्यातील अखेरच्या दिवशीचा खेळ रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. त्यामुळं सौराष्ट्रनं घडवलेला इतिहास पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उपस्थित नव्हते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी बंगालला जिंकण्यासाठी 72 धावांची गरज होती. तर सौराष्ट्रला 4 गडी बाद करण्याची गरज होती. सौराष्ट्रनं यात बाजी मारत बंगालच्या बाकी गड्यांना बाद केलं. शेवटच्या दिवशी अनुष्टुप मजूमदार आणि अर्णब बेदी यांनी खेळ सुरु केला. या दोघांनी चौथ्या दिवशी डाव सावरला होता. मात्र शेवटच्या दिवशी सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटनं मजूमदारला स्थिरावण्यास वेळच दिला नाही. मजूमदार 63 धावांवर खेळत असतानाच पायचित झाला. त्याच षटकात जयदेवनं आकाशदीपला धावबाद केलं. बंगालकडे शेवटच्या दिवशी 4 गडी आणि 72 धावा असं समिकरण होतं. मात्र सौराष्ट्रनं बंगालला 381 धावांवर रोखलं. शेवटच्या गड्यासाठी इशान पोरेल आणि अर्णब यांनी भागिदारी केली मात्र दोघांना त्यात यश आलं नाही. हे वाचा : कोरोनाचा भीती तर बघा, सेलिब्रेशन म्हणून क्रिकेटर एकमेकांना मारत आहेत पाय सौराष्ट्रचे संघ 1950-51 च्या आधी नवानगर आणि वेस्टर्न इंडिया नावाने विभागले होते. मात्र 1950 नंतर दोन्ही संघ सौराष्ट्र नावाने स्पर्धेत भाग घेऊ लागले. गुजरात आणि विदर्भ यांच्याशिवाय सौराष्ट्र हा गुजरातचा तिसरा संघ आहे. आतापर्यंत सौराष्ट्रने चार वेळा अंतिम सामन्यात धडक मारली होती. 2012-13 आणि 2015-16 च्या फायनलमध्ये मुंबईकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सौराष्ट्रच्या संघाने गेल्या हंगामातही फायनल गाठली होती. मात्र विदर्भाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हे वाचा : ‘आऊट’ होऊनही फलंदाजाने केली अर्धशतकी खेळी, VIDEO पाहून व्हाल हैराण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात