विवेक गुप्ता, मुंबई 07 एप्रिल : सरकार, डॉक्टर्स आणि जनता असे सगळे मिळून कोरोनाविरुद्ध लढाई सुरू असतानाच मुंबईत एक संतापजनक घटना घडली आहे. कुर्ल्याला लागून असलेल्या कलिना भागात बाईकस्वार तरुणीवर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव बाईक चालवत तो तरूण तिच्याजवळ आला आणि अंगावर थुंकला. त्यामुळे त्या तरूणीला मोठा धक्का बसला आहे. पीडित तरूणीने वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सगळीकडे प्रचंड काळजी घेतली जात आहे. अशा वातावरणात या बाईकस्वाराच्या कृत्यामुळे संताप निर्माण झालाय. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध FIR दाखल केला आहे. जीवाला धोकादायक असणारं इन्फेक्शन पसरवणं (कलम 270) आणि कलम 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत असून त्या बाईकस्वाराचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाव्हायरस पसरण्याचं मुख्य कारण हे थुंकी असल्याचं जगभर सांगितलं जाते. त्यामुळे मास्क वापरला जातो. मास्कमुळे तोंडातून जे तुषार बाहेर पडतात ते रोखले जातात. त्यासाठी सरकार आणि विविध संस्था, अस्थापने, सोशल मीडिया आणि इतर सर्व माध्यमांमधून प्रचंड जनजागृती करत आहे. असं असतानाही ही घडना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मोठी कारवाई, ‘त्या’ कोरोनाबाधितांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळ चालकावर गुन्हा मुंबईत कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातलं आहे. लॉकडाऊन असूनही कोरोन रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर 150 संशयीत रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक म्हणजे पूर्णपणे बरे झालेल्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, देशातील सर्वात जास्त कोरोनाचं रुग्ण असणारं पहिल्या क्रमाकांवरील राज्य आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 519 आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असल्यामुळे येत्या काळातही बीएमसीला अधिक कठोर पावलं उचलावी लागणार आहे. हेही वाचा.. सहाव्या नेगिटिव्ह टेस्टनंतर कनिका कपूरला डिस्चार्ज, डॉक्टरांनी केली ‘ही’ सूचना दुसरीकडे, संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 693 कोरोनारुग्ण सापडले आहेत. देशात कोरोनाबळींची संख्या 109 वर पोहोचली आहे. देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातही कोरोनानं थैमानं घातलं आहे. तसंच सर्वाधिक जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या पार गेला आहे. तर राज्यात आता 791 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.