मुजफ्फरपूर, 7 एप्रिल : भगवानचं लहानपण गरीबीत गेलं होतं. त्यामुळे दोन वेळची भाकरी किती महत्त्वाची आहे याची त्याला जाण आहे. लॉकडाऊन दरम्यान ज्यांच्या घरात चूल पेटली नाही त्यांच्यासाठी हा आधार म्हणून पुढे आला. विशेष बाब म्हणजे या व्यक्तीने प्रथम स्वत: गावाचं सर्वेक्षण केलं, त्यानंतर गावातील गरजू कुटुंबाना 10 दिवसांचं रेशन आणि इतर आवश्यक साहित्य दिलं. मदत करत असताना त्याने स्वत: सामाजिक अंतराचे म्हणजेच सोशल डिस्टन्सिंगचं अनुसरण केल आणि लोकांना या मार्गाचा अवलंब करण्यासाठी दिलासा मिळाला. संबंधित - कोरोनाचे रुग्ण शोधणं झालं सोपं; या टेस्ट किटला भारताने दिली मान्यता वस्तुतः अनेक कुटुंब 14 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) 2 वेळच्या भाकरीची चिंता आहे. लॉकडाउन हा संकटाचा काळ आहे, विशेषत: रोजंदारीवरील कुटुंबांसाठी. अशा परिस्थितीत या व्यक्तीने गरीब कुटुंबांना 10 दिवसांचे भोजन दिले आहे. भगवान लाल याचे बालपण गरीबीत गेलं मुझफ्फरपूरच्या सिकंदपूर भागात राहणारे भगवानलाल महतो याचं सरयागंज टॉवरजवळ कपड्यांचे दुकान आहे. त्याने लहानपणात दारिद्र्य खूप जवळून पाहिले आहे. त्याची आई आयाचं काम करायची आणि त्याचे वडील छोटंसं दुकान चालवून कुटुंबाचं पालन पोषण करायचे. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर काम करणारे कुटुंब कसं चालेल या विचाराने तो पुढे आला. आधी केलं सर्वेक्षण काही कार्यकर्त्यांच्या मदतीने या व्यक्तीने स्वतः शहरातील अत्यंत गरीब कुटुंबांचे सर्वेक्षण केले. मग आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या कुटुंबांना मदत देण्याचे ठरविले. ज्यांच्या घरात अनेक दिवसांपासून चूट पेटली नव्हती, अशा घरांना टोकन देण्यात आले आणि घरी बोलवून प्रत्येक कुटूंबाला पुढील 10 दिवस पुरेल इतकं रेशन, साबण आणि इतर वस्तू दिल्या. यावेळी त्याने 5 किलो तांदूळ, 5 किलो गव्हाचं कणिक, 5 किलो बटाटे, 1 किलो कांदा असं 10 दिवसांचं रेशन दिलं. संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.