मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऑलिंपिक 2020 बाबत सर्वात मोठी बातमी! कोरोनामुळे 90000 कोटी रुपये जाणार पाण्यात?

ऑलिंपिक 2020 बाबत सर्वात मोठी बातमी! कोरोनामुळे 90000 कोटी रुपये जाणार पाण्यात?

कोरोना व्हायरसमुळे यावर्षी टोकियो (Tokyo Olympic 2020) मध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर्षीचे टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

कोरोना व्हायरसमुळे यावर्षी टोकियो (Tokyo Olympic 2020) मध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर्षीचे टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

कोरोना व्हायरसमुळे यावर्षी टोकियो (Tokyo Olympic 2020) मध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर्षीचे टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 11 मार्च – कोरोना व्हायरसने (Coronavirus) सध्या जगभरात थैमान घातलेले आहे. जगातच नाही तर भारतातही कोरोना व्हायरसमुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यातच IPL 2020 वर कोरोनाची टांगती तलवार आहे. कोरोनाचा फटका फक्त IPL नाही तर यंदाच्या वर्षी होणाऱ्या बहुप्रतीक्षित Tokyo olympics वरही पडणार असल्याचं आता दिसत आहे. ऑलिम्पिक रद्द झालं तर 90 कोटी रुपयांची गुंतवणूक पाण्यात जाणार आहे. त्यामुळे हे प्रचंड मोठं आर्थिक संकटही ठरू शकेल.

कोरोना व्हायरसमुळे यावर्षी टोकियो मध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर्षीचे टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जपानने आतापर्यंत या जागतिक स्पर्धेच्या आयोजनावर 90 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. स्पर्धाच रद्द झाली तर त्यावर पाणी फिरेल. स्पर्धा पुढे ढकलली तरी मोठं आर्थिक नुकसान जपानला सोसावं लागणार आहे.

यंदाचे ऑलिम्पिक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडून (IOC) सांगण्यात येत आहे. पण दुसरीकडे ही स्पर्धा रद्द करण्याऐवजी 2 वर्ष लांबणीवर टाकता येईल असा उपाय ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्यांनी दिला आहे. खेळ रद्द करण्यापेक्षा थोड्या कालावधीनंतर स्पर्धा घेता येतील असं ते म्हणालेत.

एक किंवा दोन वर्षांसाठी लांबणीवर?

Tokyo Olympics संबंधी टोकियो ऑलिम्पिक एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य हारूयूकी ताकाहाशी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, 'व्हायरसमुळे खेळांवर कसा परिणाम होऊ शकतो यावर चर्चा सुरू आहे. याबाबत पूर्वी डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत काही चर्चा झाली नव्हती. कारण तेव्हा कोरोना व्हायरसचा इतका प्रभाव दिसत नव्हता', असंही ते म्हणाले. ताकाहाशी यांनी 'द वॉल स्ट्रीट जनरल'शी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, "Tokyo Olympics रद्द होतील असं मला वाटत नाही. फक्त सामने स्थगित केले जाऊ शकतात.

वाचा - Corona इफेक्ट : IPL बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय?

याचे मुख्य कारण म्हणजे IOC ला याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. इतकेच नाही तर एक वर्ष जर स्पर्धा स्थगित केल्या तर दुसऱ्या मोठ्या स्पर्धेच्या तारखा आणि ऑलिम्पिकच्या तारखा या सोबतच येतील. त्यामुळे खेळाडूंवर यांचा परिणाम होईल." दरम्यान, 'एप्रिलमध्ये ऑलिम्पिक कमिटी याबाबत गांभीर्याने विचार करेल', असंही त्यांनी सांगितलं आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा मोठा फटका

चीनपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात तब्बल 1 लाख लोकांना संकटात आणलं आहे. इतकंच नाही तर कोरोनामुळे जगात जवळपास 4000 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत विविध ठिकाणी असलेल्या मोठ्या क्रीडास्पर्धा सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान यंदाच्या Tokyo Olympic स्पर्धांची सुरुवात 24 जुलैपासून होणार आहे. यंदाचे ऑलिम्पिक सामने हे जुलैपासून ते ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.

अन्य बातम्या

Coronavirus आधी 'या' महाभयंकर आजारांमुळेही जगभरात लागू झाली होती हेल्थ एमर्जन्सी

कोरोनाची लस घ्या, लाखो रुपये घेऊन जा; लसीच्या ह्युमन टेस्टसाठी ऑफर

First published:

Tags: Corona