• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Copa America Final Live: 28 वर्षांनंतर अर्जेंटीनाचं स्वप्न पूर्ण; मेस्सीच्या टीमनं ब्राझीलचा 1-0 ने उडवला धुव्वा

Copa America Final Live: 28 वर्षांनंतर अर्जेंटीनाचं स्वप्न पूर्ण; मेस्सीच्या टीमनं ब्राझीलचा 1-0 ने उडवला धुव्वा

Copa America Final Live: ब्राझीलमधील रिओ दी जिनेरियो शहरातील मारकाना स्टेडियममध्ये आज अर्जेंटीना आणि ब्राझील (Argentina Vs Brazil) यांच्यात कोपा अमेरिका अंतिम सामन्याची (Final match) रंगत पाहायला मिळाली.

 • Share this:
  रिओ दी जिनेरियो, 11 जुलै: ब्राझीलमधील रिओ दी जिनेरियो शहरातील मारकाना स्टेडियममध्ये आज अर्जेंटीना आणि ब्राझील (Argentina Vs Brazil) यांच्यात कोपा अमेरिका अंतिम सामन्याची (Final match) रंगत पाहायला मिळाली. या सामन्यात अर्जेंटीनानं ब्राझीलवर 1-0 ने मात केली (Argentina beat Brazil 1-0) आहे. स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी आणि नेमार यांच्यात रंगलेल्या या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. अर्जेटीनानं पूर्वार्धात ब्राझीलविरुद्ध 1-0 आघाडी घेतली. अर्जेंटीनाकडून सामन्याच्या 22 व्या मिनिटाला एंजेल डी मारियानं गोल करुन आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. अर्जेंटीनानं तब्बल 28 वर्षानंतर दुसऱ्यांदा या करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. हेही वाचा-IPL 2022 : '...तर मी पुढील IPL खेळणार नाही', सुरेश रैनाची मोठी घोषणा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटीनानं 2015 आणि 2016 मध्ये दोनदा अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यावेळी विजेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली होती. अर्जेंटीनानं यापूर्वी 1993 मध्ये हा करंडक जिंकला होता. ब्राझीलला हरवून अर्जेंटीनानं लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीत हा महत्त्वाचा चषक आपल्या नावावर केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: