सुरत, 30 नोव्हेंबर: क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्या स्पर्धेत अनेक वेळा फलंदाज बाजी मारतात. पण काही गोलंदाज असे असतात जे फलंदाजांवर वरचढ ठरतात. भारतीय क्रिकेटमध्ये असा एक गोलंदाज आहे ज्याने गेल्या 87 वर्षात कोणालाही जमले नाही अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शुक्रवारी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत हरियाणाविरुद्ध जलद गोलंदाज अभिमन्यू मिथुन (Abhimanyu Mithun)याने विक्रमी कामगिरी केली. मिथुनने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केवळ हॅट्रीक घेतली नाही तर प्रतिस्पर्धी संघाला ऑल आऊट केला. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकच्या मिथुनने अखेरच्या षटकात पाच विकेट घेतल्या. प्रथम त्याने हिमांशु राणा (61) आणि राहुल तेवतिया (34) यांना बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने सुमित कुमार याला बाद करत हॅट्रिक पूर्ण केली. चौथ्या चेंडूवर मिथुनने अमित मिश्राची विकेट गेतली आणि सहाव्या चेंडूवर जयंत यादव याला बाद करत हरियाणाचा ऑल आऊट केला. मिथुनने 39 धावा देत 5 विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने विक्रमी कामगिरी स्वत:च्या नावावर केली. मिथुनने अखेरच्या ओव्हरमध्ये दोन धावा दिल्या त्यातील एक धाव वाईड मुळे मिळाली होती. मिथुनने शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर सलग 4 चेंडूवर 4 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे हरियाणाने 20 षटकात 8 बाद 194 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरच्या आधी म्हणजेच 19व्या षटकापर्यंत हरियाणाने 3 बाद 192 धावा केल्या होत्या.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हॅट्रिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धेत हॅट्रिक घेणारा मिथुन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारतीय संघाला 1932 मध्ये कसोटी खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या 87 वर्षात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आली नाही. गेल्याच महिन्यात मिथुनने विजय हजारे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. तर 2009मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात त्याने अशीच कामगिरी केली होती. डबल हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय क्रिकेटमध्ये असे फार कमी गोलंदाज आहेत ज्यांनी सलग 4 चेंडूवर 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेचा जलद गोलंदाज लसित मलिंगा याने दोन वेळा 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या आहेत. त्यांनी वनडे आणि टी-20मध्ये अशी कामगिरी केली आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान याने देखील 4 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. मिथुन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे ज्याने 4 विकेट म्हणजेच डबल हॅट्रिक घेतली आहे.
HAT-TRICK:
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 29, 2019
Vijay Hazare Trophy final ✅
Syed Mushtaq Ali Trophy semi-final ✅@imAmithun_264 is on a roll.
Follow it live 👉👉 https://t.co/fYjNa71y13#HARvKAR @paytm #MushtaqAliT20 pic.twitter.com/jwh3YujEnI
फक्त 6 जणांनी केली अशी कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 5 विकेट घेण्याचा पराक्रम आतापर्यंत केवळ 6 गोलंदाजांनी केला आहे. यातील सर्वात ताजे नाव म्हणजे अभिमन्यु मिथुन होय. मिथुनच्या आधी 1937मध्ये बिल कॉपसन, 1938मध्ये विल्यम हेंडरसन, 1972मध्ये पॅट पोकॉक, 2004मध्ये यासिर अराफत आणि 2011मध्ये निल वॅगनर यांनी अशी कामगिरी केली आहे. विक्रमी कामगिरीनंतर देखील मिथुन अडचणीत भारतीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर मिथुन चर्चेत आला आहे. पण असे असेल तरी कर्नाटक पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मिथुनला नोटिस बजावली आहे. याप्रकरणात पोलिसांनी याआधीच दोन खेळाडूंना ताब्यात गेतले आहे. तर मिथुनला नोटिस बजावली आहे. त्यामुळे स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मिथुनच काय होतं. त्यावर त्याचे क्रिकेटमधील भविष्य ठरणार आहे.

)







