सिडनी, 18 जुलै : कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे आयोजन ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात होणार आहे. मात्र आर्थिक तरतूद नसल्याच्या कारणाने आयोजन करण्यास व्हिक्टोरिया राज्याने असमर्थता दर्शवली आहे. यामुळे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनला मोठा धक्का बसला आहे. फेडरेशनने यावर लवकरच तोडगा काढू असं म्हटलं आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेला आयोजक शोधण्यासाठी फेडरेशनला आधी बरीच उठाठेव करावी लागली होती. अखेर एप्रिल2022 मध्ये व्हिक्टोरियाकडे यजमानपद सोपवलं होतं. व्हिक्टोरियाचे प्रमुखे डेनियल एंड्रूज यांनी सांगितले की, आधी स्पर्धेचे बजेट जवळपास 15 हजार कोटी रुपये होते, आता ते वाढून 34 हजार कोटी रुपये इतके झाले आहे. भारत - पाकिस्तान लढतीची तारीख ठरली, 15 दिवसात 3 सामने होण्याची शक्यता डेनियल एंड्रूज यांनी म्हटलं की, आम्ही कठिण परिस्थितीतून गेलो आहे. पण ही वेगळ्या प्रकारची समस्या आहे. स्पष्टपणे सांगायचं तर स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही 34 हजार कोटी खर्च करू शकत नाही. आम्ही शाळा आणि हॉस्पिटलचे पैसे कमी करून याचे आयोजन नाही करू शकणार. याबाबत कॉमनवेल्थ फेडरेशनला माहिती दिली आहे. 2026 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थमध्ये 5 हजारहून अधिक एथलिट सहभागी होणार आहेत. 20 पेक्षा अधिक क्रीडा प्रकारातील स्पर्धा इथे होईल. याआधीच्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये बर्मिंघमन इथे आयोजीत केल्या होत्या. तेव्हा भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकासह एकूण 61 पदके जिंकली होती. तर एकूण 179 पदकांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर होते. याआधी ऑस्ट्रेलियात 4 वेळा कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केले गेले आहे. 1938, 1962, 1982 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ आयोजित करण्यात आल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.