मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण हॅटट्रिक; नीतू, अमितपाठोपाठ निखत झरीनला गोल्ड

CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण हॅटट्रिक; नीतू, अमितपाठोपाठ निखत झरीनला गोल्ड

निखत झरीन

निखत झरीन

CWG 2022 : नीतू घंघास, अमित पंघालनंतर भारताच्या निखत झरीननंही सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. झरीननं 50 किलो वजनी गटात आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉलचा पराभव करत गोल्डन पंच लगावला.

बर्मिंगहॅम, 07 ऑगस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत आज दहाव्या दिवशी भारतीय बॉक्सर्सचा दबदबा राहिला. भारतानं आज बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्णपदकं मिळवली. नीतू घंघास, अमित पंघालनंतर भारताच्या निखत झरीननंही सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. झरीननं 50 किलो वजनी गटात आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉलचा पराभव करत गोल्डन पंच लगावला. झरीननं मिळवलेलं हे भारतासाठीचं आजच्या दिवसातलं चौथं पदक ठरलं. तर भारताच्या खात्यात आतापर्यंत 17 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.

आज दुपारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बॉक्सर नीतू घंघासनं बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. नीतूनं 48 किलो या वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तिनं अंतिम सामन्यात ब्रिटनच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करुन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर नीतू घंघासपाठोपाठ अमित पंघालनंही गोल्डन पंच लगावला. त्यानं 51 किलो वजनी गटात इंग्लंडच्या  कायरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेतलं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं.

हेही वाचा - CWG 2022: तिहेरी उडीत घडला इतिहास, पाहा भारतीय अ‍ॅथलिट्सची विक्रमी कामगिरी

पदक जिंकल्यानंतर निखत भावूक

सुवर्णपदक जिंकल्यानंतर निखत झरीन भावून झाली होती. 'पदक स्वीकारतानाचा तो क्षण मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. माझ्यासाठी तो क्षण खूप अविस्मरणीय आणि भावनिक होता. मी यापुढेही देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करेन' अशी प्रतिक्रिया निखत झरीननं पदक स्वीकारल्यानंतर दिली.

राष्ट्रकुल स्पर्धेआधी वर्ल्ड चॅम्पियन

निखत झरीननं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधी तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. तर फेब्रुवारी महिन्यात बल्गेरियातील स्पर्धेतही तिनं सोनेरी यश संपादन केलं होतं. तोट फॉर्म तिनं बर्मिंगहॅममध्येही कायम ठेवला.

मेरी कोम आदर्शस्थानी

25 वर्षांची झरीन मूळची तेलंगणाची. 13 वर्षांची असतानाच तिनं बॉक्सिंगला सुरुवात केली. 2015 साली तिनं कॉलेजमध्ये शिकत असताना आंतर विद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा किताब मिळवला होता. त्यानंतर राष्ट्रीय बॉक्सिंग, वर्ल्ड यूथ बॉक्सिंग आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निखतची कामगिरी बहरत गेली. निखत झरीन भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर मेरी कोमला आपली आदर्श मानते. तिनं अनेक वेळा जाहीरपणे मेरी कोम क्रीडा क्षेत्रातील तिची आदर्श असल्याचं सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Boxing champion, Sport