मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पोलार्डची कारकिर्द अनेक कारणांमुळे ठरली वादग्रस्त, या वादांनी वेधले सर्वाधिक लक्ष

पोलार्डची कारकिर्द अनेक कारणांमुळे ठरली वादग्रस्त, या वादांनी वेधले सर्वाधिक लक्ष

Kieron Pollard Retirement

Kieron Pollard Retirement

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा किरॉन पोलार्ड (Kieron Pollard Retirement) त्याच्या खेळासाठी तसेच त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. अशातच पोलार्डसंदर्भात क्रिकेट जगतात घडलेले अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. . आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टी20 लीग, मैदानावर असे अनेक प्रसंग घडले आहेत; जेव्हा पोलार्डचे आपल्या भावनांवरील नियंत्रण हरवून बसला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 21एप्रिल: आयपीएल खेळण्यासाठी भारतात असलेल्या वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कायरन पोलार्डने(Kieron Pollard)धक्कादायक निर्णय घेतला आहे. पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय (Kieron Pollard Retirement)घेतला आहे. जगातल्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये विक्रम करणाऱ्या पोलार्डने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा कायरन पोलार्ड त्याच्या खेळासाठी तसेच त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. अशातच पोलार्डसंदर्भात क्रिकेट जगतात घडलेले अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. . आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टी20 लीग, मैदानावर असे अनेक प्रसंग घडले आहेत; जेव्हा पोलार्डचे आपल्या भावनांवरील नियंत्रण हरवून बसला आहे.

मिचेल स्टार्कची झुंज

आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त क्षण ठरला आहे. 2014 च्या आयपीएल हंगामात बंगळुरू आणि मुंबई यांच्यात सामना सुरू होता. यादरम्यान स्टार्क रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी येत असताना पोलार्ड स्टंपसमोरून निघून गेला होता. मात्र त्यानंतरही स्टार्कने त्याच्या दिशेने चेंडू फेकला. यानंतर पोलार्ड रागाने त्यांच्याकडे गेला आणि आपली बॅट त्यांच्या दिशेने फेकली. दोन्ही खेळाडूंमधील वाढता वाद पाहून पंच आणि सहकारी खेळाडूंनी हा वाद मिटवला.

फील्डवर तोंडाला टेप लावा

2015 च्या आयपीएल हंगामात मुंबईचा पुन्हा एकदा बंगळुरूशी सामना झाला. या सामन्यात पोलार्डने आपल्याच देशाचा खेळाडू गेलशी झुंज दिली. त्यानंतर अंपायरने पोलार्डला समजावून तेथून पाठवले. यानंतर पोलार्ड तोंडात टेप लावून लाँग ऑफ आला. त्यांच्या या कृतीवर जोरदार टीकाही झाली. यावेळी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगही हसले.

पोलार्डची ‘गांधीगिरी’

सीपीएल 2021 च्या नवव्या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सचा सामना सेंट लुसिया किंग्जशी चालू होता. या सामन्यात सेंट लुसियाने नाणेफेक जिंकल्यानंतर नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. किरॉन पोलार्ड आणि टिम सेफर्ट त्रिनबागो नाईट रायडर्सच्या डावादरम्यान 19व्या षटकात फलंदाजी करत होते. अशात गोलंदाज केसरिक विल्यम्सने एक चेंडू ऑफ-स्टंपच्या खूप बाहेर फेकला, इतका की फलंदाज सेफर्टला डायव्ह मारून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. चेंडू बॅटला लागलाच नाही. पण पंचांनी यावर विश्वास ठेवला नाही आणि वाईड बॉल दिला नाही.

IPL सुरू असतानाच पोलार्डने घेतला धक्कादायक निर्णय, क्रिकेट विश्वात खळबळ

हे दृश्य पाहिल्यानंतर सेफर्टने पंचांना प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त केली. पण दुसऱ्या टोकावर उभा असलेला कर्णधार किरॉन पोलार्ड इतका चिडला की, त्याने आपला निषेध व्यक्त करण्याचा एक विचित्र मार्ग स्वीकारला. तो खेळपट्टीपासून खूप दूर जाऊन उभा राहिला. पोलार्ड 30 यार्ड वर्तुळाच्या जवळ उभा राहिला आणि हे दृश्य पाहिल्यानंतर बरेच खेळाडू हसत राहिले. पोलार्ड पंचांना सांगण्याचा प्रयत्न करत होता की, कदाचित वाईड देण्याची सीमा खेळपट्टीपासून खूप दूर आहे.

कायरन पोलार्डने (Kieron Pollard) १० एप्रिल, २००७मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एक वर्षानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते.

त्याने आतापर्यंत 123 वनडे सामने आणि 101 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत २६.०२च्या सरासरीने २७०६ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 13 अर्धशतकेही झळकावली आहेत. तसेच, गोलंदाजी करताना 5.7 च्या इकॉनॉमी रेटने 55 विकेट्सही घेतल्यात. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 101 सामने खेळताना 25.31 च्या सरासरीने 1569 धावांचा पाऊस पाडलाय. या धावा करताना त्याने 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. टी20 त गोलंदाजी करताना त्याने 8.33 च्या इकॉनॉमी रेटने 42विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

कायरन पोलार्डने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत फक्त एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट खेळले, त्याने भारताविरुद्ध दोन्ही क्रिकेट प्रकारातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

First published:

Tags: Kieron pollard, West indies