नवी दिल्ली, 20 मे: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज भुवनेश्वर याच्या वडिलाचं निधन (Bhuvneshwar Kumar Father Death) झालं आहे. भुवनेश्वर कुमार याचे वडील किरणपाल सिंह गेल्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. मेरठमध्ये आपल्या राहत्या घरी किरनपाल सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून भुवी देखील घरी राहून वडिलांची काळजी घेत होता. किरणपाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलीस सेवेत कार्यरत होत. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या दिल्लीतील एम्स आणि नोएडा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. भुवनेश्वरच्या वडिलांवर परदेशी डॉक्टरही उपचार करत होते. त्यांना यकृताचा त्रास होत होता.
हेही वाचा- या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! Appraisal फॉर्म भरण्याची तारीख वाढवली
2015 साली भुवनेश्वरच्या वडिलांना मिळाली होती धमकी
2015 साली भुवनेश्वर कुमारच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी भुवी श्रीलंका दौऱ्यावर होता. जमीन संदर्भातल्या एका व्यवहारात ही धमकी दिली होती. त्यानंतर मेरठच्या DIG नी भुवनेश्वरच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवली होती.
भुवनेश्वर जाणार श्रीलंका दौऱ्यावर?
वडिलांच्या निधनानंतर भुवनेश्वर कुमार जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर आहे. दरम्यान दुखापतीनंतर भुवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होते. इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी20 मध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती.
हेही वाचा- मध्य रेल्वेचं ठाकरे सरकारला पत्र, कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी मागणी
वेदा कृष्णमूर्ती आणि प्रिया पूनिया यांना मातृशोक
टीम इंडियाच्या महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्ती आणि प्रिया पूनिया यांच्याही आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. वेदा कृष्णमूर्तीच्या आईचं कोरोनानं निधन झालं तर काही दिवसानंतर तिच्या बहिणाचाही कोरोनानं मृत्यू झाला. प्रिया पूनिया हीच्या आईचं देखील कोरोनामुळे निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Sports, Team india