मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मध्य रेल्वेचं ठाकरे सरकारला पत्र, कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी मागणी

मध्य रेल्वेचं ठाकरे सरकारला पत्र, कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी मागणी

अनेक रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून येताहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं (Central Railways) राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे.

अनेक रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून येताहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं (Central Railways) राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे.

अनेक रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून येताहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं (Central Railways) राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे.

मुंबई, 20 मे: राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळत आहे. अशातच रेल्वेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपली सेवा बजावत आहे. याच दरम्यान अनेक रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून येताहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं (Central Railways) राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. त्यासाठी मध्य रेल्वेनं राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र लिहिलं आहे. या पत्रात रेल्वेकडून आपल्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर (Frontline Workers) घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी राज्य सरकारसोबत पत्र व्यवहार करून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्याची मागणी केलीय.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (General Manager) संजीव मित्तल यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं की, महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडाही जास्त आहे. अशात सेवा बजावताना अनेक कर्मचारी अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्यानं त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करुन त्यांन व्हॅक्सिनेशनमध्ये प्राधान्य द्यावे.

हेही वाचा- फडणवीसांनी अहवाल द्यावा, पंतप्रधान महाराष्ट्राला 1500 कोटी देतील', राऊतांची टोलेबाजी

ओडिसा आणि केरळ सरकारनं रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित केलं आहे. यानंतर आता मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी राज्य सरकारला पत्र पाठवून मागणी केली आहे.

मुंबईत ३२ हजार कर्मचारी

जवळपास एकूण 1 लाख कर्मचारी मध्य रेल्वेमध्ये आहेत. त्यात मुंबई भागात 32 हजार कर्मचारी काम करताहेत. रेल्वेनं स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या जागी व्हॅक्सीनेशन सेंटर सुरु करून जवळपास 51 टक्के कर्मचाऱ्यांचं लसीकरण केले आहे. मात्र त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना एक तर काही कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात काम करणाऱ्या 9हजार कर्मचाऱ्यांचं आतापर्यंत लसीकरण पूर्ण झालं आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांचा एक डोस तर काही कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस झाल्याचं समजतंय. कारण रेल्वे विभागातही लशीचा तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा-  हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह Tweet बद्दल शरजीलवर महाराष्ट्र पोलीसांचाही बडगा

जर रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित केल्यास लसीकरणास प्राधान्य मिळेल. त्यामुळे राज्य सरकारला पत्र लिहिण्याचं हे मुख्य कारण आहे. मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितलं की, रेल्वेचे कर्मचारी कोरोनाच्या महामारीच्या संकटात 24 तास काम करत आहेत. त्यामुळे जास्त लोकांच्या संपर्कात आल्यानं त्यांन कोरोनाची लागण होण्याची जास्त भीती आहे.

पुढे शिवाजी सुतार म्हणाले की, आम्ही राज्य सरकारला निविदेन केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा आणि त्यांना व्हॅक्सीनेशनमध्ये प्राधान्य द्या. दरम्यान राज्य सरकार या पत्रावर काय प्रतिक्रिया देणार याच्या प्रतिक्षेत असल्याचं सुतार यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Central railway, Corona updates, Corona vaccination