मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियासाठी खुशखबर! भारताच्या स्टार गोलंदाजावर लंडनमध्ये झाली यशस्वी सर्जरी

टीम इंडियासाठी खुशखबर! भारताच्या स्टार गोलंदाजावर लंडनमध्ये झाली यशस्वी सर्जरी

भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) अनेक दिग्गज खेळाडू सध्या जखमी आहेत.

भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) अनेक दिग्गज खेळाडू सध्या जखमी आहेत.

भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) अनेक दिग्गज खेळाडू सध्या जखमी आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde

राजकोट, 16 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) अनेक दिग्गज खेळाडू सध्या जखमी आहेत. त्यामुळं ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं भारतासाठी ही चिंतेची बाब असणार आहे. जखमी खेळाडूंमध्ये सध्या ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार आणि पृथ्वी शॉ यांची नावे आहेत.

दरम्यान, भुवनेश्वर कुमार आणि पृथ्वी शॉ यांच्या संदर्भात अपडेट बीसीसीआयने प्रसिद्ध केले आहे. यात असे म्हटले आहे की 11 जानेवारी रोजी लंडनमध्ये त्याच्यावर हर्नियाचे ऑपरेशन झाले. त्याचबरोबर शॉ आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो भारत अ मध्ये सामील होण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाला आहे. दरम्यान, भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेदरम्यान जखमी झाला होता. त्याचवेळी कर्नाटक विरुद्ध रणजी करंडक सामन्यादरम्यान शॉला खांद्याला दुखापत झाली होती.

वाचा-विराट, रोहित आणि बुमराहची चांदी; तर धोनीला दररोज 2 लाखांचा फटका

वाचा-धोनीला मोठा धक्का! बीसीसीआयने करारातून वगळलं

भुवीवर लंडनमध्ये झाली शस्त्रक्रिया

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 9 जानेवारीला लंडनला गेला होता आणि 11 जानेवारी रोजी हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. टीम इंडियाचे फिजिओथेरपिस्ट योगेश परमार त्यांच्यासमवेत होते. भुवनेश्वर कुमार आता बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिट होईपर्यंत त्याला ठेवण्यात येणार आहे.

वाचा-भारताशी पंगा घेणं पाकला पडलं महागात! काढून घेतले आशिया कपचे यजमानपद

शॉ झाला न्यूझीलंडला रवाना

दरम्यान, बीसीसीआयनं पृथ्वी शॉबाबत सलामी फलंदाज पृथ्वी शॉने तंदुरुस्त झाला असून न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या भारत अ संघासाठी रवाना झाला आहे.

First published:

Tags: Cricket