मुंबई, 16 जानेवारी : बीसीसीआयच्या वतीनं ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यावर्षी बीसीसीआयकडून 27 खेळाडूंशी वार्षिक करार करण्यात आला आहे. बीसीसीआयनं या करारात प्रामुख्याने चार गट केले आहेत. ग्रेड A+ मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वर्षाकाठी सात कोटी रुपये, ग्रेड Aच्या खेळाडूंना पाच कोटी रुपये दिले जातात. त्याचबरोबर ग्रेड B मधील तीन कोटी आणि ग्रेड Cच्या खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जातात. कर्णधार कोहली A+ श्रेणीत सामील सर्वात उंच ग्रेड असलेल्या A+मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर वनचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना करारानुसार सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. वाचा- धोनीला मोठा धक्का! बीसीसीआयने करारातून वगळलं
The BCCI announces the Annual Player Contracts for Team India (Senior Men) for the period from October 2019 to September 2020.
— BCCI (@BCCI) January 16, 2020
Saini, Mayank, Shreyas, Washington and Deepak Chahar get annual player contracts.
More details here - https://t.co/84iIn1vs9B #TeamIndia pic.twitter.com/S6ZPq7FBt1
वाचा- भारताशी पंगा घेणं पाकला पडलं महागात! काढून घेतले आशिया कपचे यजमानपद ग्रेड Aमध्ये ऋषभ पंतचा समावेश बीसीसीआयच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या करारात ग्रेड Aमध्ये एकूण 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत असेलल्या खेळाडूंना दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातील. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी या गोलंदाजांचा तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, शिखर धवन आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, ग्रेड बीमध्ये ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha), उमेश यादव (Umesh Yadav), यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचे नाव तीन कोटींच्या यादीत टाकण्यात आले आहे. वाचा- पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू झाले ‘मस्तीजादे’, शेअर केला शर्टलेस फोटो दीपक चाहर आणि नवदीप सैनी पहिल्यांदा झाले करारात सामिल ग्रेड Cमध्ये आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना वर्षाला 1 कोटी रुपये देण्यात येतात. यात केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर यांच्याशिवाय दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे नाव सामिल करण्यात आले आहे.

)







