मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी BCCI ने दिली या खेळाडूंची नावं

खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी BCCI ने दिली या खेळाडूंची नावं

बीसीसीआयने (BCCI) खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांची शिफारस केली आहे.

बीसीसीआयने (BCCI) खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांची शिफारस केली आहे.

बीसीसीआयने (BCCI) खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांची शिफारस केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 जून: बीसीसीआयने (BCCI) खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांची शिफारस केली आहे. भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) आणि मिताली राज (Mithali Raj) यांची खेल रत्न (Khel Ratna) पुरस्कारासाठी तर शिखर धवन (Shikhar Dhawan), केएल राहुल (KL Rahul) आणि जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अर्जुन पुरस्कारासाठी (Arjun Award) शिफारस केली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं, 'आमच्यामध्ये याबाबत विस्तृत चर्चा झाली आहे. खेल रत्नसाठी अश्विन आणि मिताली, तर अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा शिखर धवनचं नाव पाठवण्यात आलं आहे. शिखरसोबतच केएल राहुल आणि बुमराह यांच्या नावाचीही शिफार केली आहे.'

क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेली समिती ऑलिम्पिक वर्षात कोणत्या क्रिकेटपटूंचा पुरस्कारासाठी विचार करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मिताली राजने मागच्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्ष पूर्ण केली. 38 वर्षांच्या मितालीने वनडेमध्ये 7 हजारांपेक्षा जास्त रन केल्या आहेत. वनडे क्रिकेटमधली ती जगातली सगळ्यात यशस्वी महिला खेळाडू आहे.

मितालीप्रमाणेच अश्विनलाही याआधी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. अश्विनने भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्याला 79 टेस्टमध्ये 413 विकेट मिळाल्या आहेत. याशिवाय वनडेमध्ये त्याला 150 विकेट आणि टी-20 मध्ये 42 विकेट मिळाल्या आहेत.

शिखर धवन मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी श्रीलंकेत टीम इंडियाचं नेतृत्व करेल. अर्जुन पुरस्कारासाठी धवन प्रबळ दावेदार आहे. डावखुऱ्या धवनने 142 वनडेमध्ये 5,977 रन केले आहेत. याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2,315 आणि टी-20 मध्ये 1,673 रन आहेत.

क्रीडा मंत्रालयाने या पुरस्कारांसाठी नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख एक आठवड्याने वाढवली होती, त्यामुळे क्रीडा संघटनांना 28 जूनऐवजी 5 जुलैपर्यंत खेळाडूंच्या नावांची शिफारस करता येणार आहे. टेनिस, कुस्ती आणि बॉक्सिंग संघटनांनी खेळाडूंचं नामांकन पाठवलं आहे, तर बीसीसीआय काहीच दिवसांमध्ये खेळाडूंची यादी पाठवणार आहे.

मागच्यावर्षी सरकारने मनिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगट, राणी रामपाल आणि मरियप्पन फंगावेलु या पाच जणांना खेल रत्न पुरस्कार दिला होता. एका वर्षात 5 खेळाडूंना खेल रत्न देण्याची ही पहिलीच वेळ होती.

First published:

Tags: BCCI, Cricket, Jasprit bumrah, Kl rahul, R ashwin, Shikhar dhavan, Sports, Team india