धोनीचं कमबॅक होणार की नाही? टीम इंडियाबद्दल सेहवागचं मोठं वक्तव्य

धोनीचं कमबॅक होणार की नाही? टीम इंडियाबद्दल सेहवागचं मोठं वक्तव्य

धोनीच्या पुनरागमनाबद्दल भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या मैदानापासून दूर आहे. आयपीएलमधून तो पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेल. पण कोरोनामुळे आयपीएलवरच संकट ओढावलं आहे. आता त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. तो पुनरागमन करणार की निवृत्ती घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, धोनीच्या पुनरागमनाबद्दल भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलं आहे.

सेहवाग आणि धोनी यांच्यात मैदानावर असलेले वाद लपून राहिलेले नाहीत. सेहवाग नेहमीच धोनीबाबत टीका करत आला आहे. आता त्यानं धोनीच्या कमबॅकबद्दल मोठं विधान केलं आहे. धोनीचं कमबॅक सोपं नाही. कारण सध्याचा संघ संतुलित आहे आणि अशा परिस्थितीत धोनी कोणाच्या जागी फिट होणार हा प्रश्न असल्याचं सेहवागनं म्हटलं आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने म्हटलं की, धोनी कोणाच्या जागी फिट होणार. संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघेही आहेत. त्यात राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं या संघात बदल करून पुढे जाण्याचा पर्याय दिसत नाही असं म्हणत सेहवागनं अप्रत्यक्ष धोनीचं कमबॅक जवळपास शक्य नसल्याचंच म्हटलं आहे.

हे वाचा : भर मैदानात महिला अँकरने कुरवाळली खेळाडूची दाढी, क्रिकेटपटूने केली कमेंट

न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खावा लागला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात आहे. कोहलीचं समर्थन करण्यासाठी सेहवाग पुढं आहे. तो म्हणाला की, प्रत्येकाला बॅड पॅचमधून कधी ना कधी जावं लागतं. मग तो सचिन तेंडुलकर असेल किंवा स्टीव्ह वॉ. जॅक कॅलिस असेल किंवा रिकी पाँटिंग. आपल्याला हे मान्य करावं लागेल की, न्यूझीलंडचा संघ कसोटी, वनडेमध्ये आपल्यापेक्षा चांगला खेळला.

हे वाचा : कोरोनाला पळवण्यासाठी मुंबईकर श्रेयर अय्यरचा खास डान्स, VIDEO पाहिलात का?

First published: March 18, 2020, 12:36 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या