मुंबई, 23 नोव्हेंबर: आगामी आयपीएलआधी मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्सनं गेल्या आयपीएल लिलावात तब्बल 8 कोटी रुपयांना खरेदी केलेला हुकमी एक्का यंदाच्या सीझनमध्ये मात्र खेळू शकला नाही. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मात्र तो खेळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्या खेळाडूचं नाव आहे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर. आर्चर तब्बल दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरला. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी ही आशादायी बाब म्हणावी लागेल. इतकच नव्हे तर मुंबई इंडियन्सनं आर्चरला आगामी साऊथ आफ्रिका टी20 साठी एम आय केपटाऊन या आपल्या टीममध्येही वाईल्ड कार्ड एन्ट्री दिली आहे.
.@JofraArcher, welcome to Cape Town. 🔥💙@SA20_League wild card pick ✅ pic.twitter.com/7EWaQ7fwRH
— MI Cape Town (@MICapeTown) November 23, 2022
दुबईत सराव सामन्यात उतरला आर्चर सध्या इंग्लंडचा संघ यूएईत आहे. पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी सध्या अबुधाबीत इंग्लंड आणि इंग्लंड लायन्स असा तीन दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यात जोफ्रा आर्चर आज इंग्लंड लायन्स संघाकडून मैदानात उतरला. आर्चरनं बॉलिंगही केली. त्यामुळे तो लवकरच आंतरराष्ट्रीय आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल असा विश्वास आहे.
Jofra Archer bowling in England whites, to Zak Crawley pic.twitter.com/Z8Z8appECw
— Will Macpherson (@willis_macp) November 23, 2022
हेही वाचा - Yuvraj Singh: सिक्सर किंग युवराज सिंग अडचणीत… युवीवर गोव्यात कारवाई; पाहा काय आहे नेमकं प्रकरण?
Jofra Archer is back in action 🙌 pic.twitter.com/pLn4Uq1wGI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 23, 2022
मुंबई इंडियन्सचं ट्विट मुंबई इंडियन्सनंही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ‘आला रे’ असं कॅप्शन देत आर्चर परतल्याची वर्दी दिली आहे…
𝘼𝙖𝙡𝙖 𝙧𝙚 👀#OneFamily @JofraArcher @englandcricket pic.twitter.com/65a13w7N9O
— Mumbai Indians (@mipaltan) November 23, 2022
आर्चरची दुखापत… इंग्लंडला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सइतकाच मोठा वाटा आहे तो जोफ्रा आर्चरचा. आर्चरनेच वर्ल्ड कपमध्ये ती निर्णायक सुपर ओव्हर टाकली होती. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर राहिला. जोफ्रा आर्चर मार्च 2021 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर कोपर आणि पाठीच्या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडकडून खेळता आलं नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला 8 कोटींची घसघशीत बोली लागली होती. पण दुखापतीमुळे त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळता आलं नाही. पण पुढच्या सीझनमध्ये आर्चर मुंबईसाठी ट्रम्प कार्ड ठरु शकतो.