नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या IPL स्पर्धेआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चिनी कंपनीची साथ सोडली आहे. गेली काही वर्षं IPL साठी VIVO ही चिनी मोबाईल कंपनी स्पॉन्सरशिप देत होती. पण या वर्षीच्या IPL च्या 13 व्या हंगामासाठी VIVO चं प्रायोजकत्व घेणार नसल्याचं BCCI ने स्पष्ट केलं आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून UAE मध्ये होणाऱ्या IPL 2020 साठी Vivo Mobile India Pvt Ltd ची साथ नसेल. BCCI ने विवो बरोबर केलेला करार मोडला आहे.
Board of Control for Cricket in India (BCCI) and Vivo Mobile India Pvt Ltd have decided to suspend their partnership for IPL in 2020: Indian Premier League
— ANI (@ANI) August 6, 2020
दोन वर्षांपूर्वी BCCI आणि VIVO मोबाईल कंपनीचा करार झाला होता. IPL स्पर्धा VIVO प्रायोजित करीत असे. त्यासाठी या कंपनीने BCCI ला 2200 कोटी रुपये दिले होते. पण आता हा करार मध्येच संपुष्टात आला आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. कधी, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार IPL 2020 चे सामने? या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे. आयपीएलचे आयोजन युएइच्या अबु धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात युएइ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे. खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.