अखेर आयपीएलची (IPL 2020) तारीख निश्चित झाली आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. यंदाचा हंगाम 53 दिवस चालणार आहे.
या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे. आयपीएलचे आयोजन युएइच्या अबु धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे.
बीसीसीआयनं यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे. लवकरच सर्व खेळाडूंना ही नियमावली पाठवण्यात येणार आहे.
खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.
आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएलचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. स्टारच्या सर्व चॅनलवर आणि हॉटस्टारवर हा सामना पाहता येईल.
दरम्यान, भारतीय वेळेनुसार हे काही सामने दुपारी 3 वाजता तर काही सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत.