मुंबई, 21 डिसेंबर : टी 20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या दोघांच्या कार्यपद्धतीवर क्रिकेट फॅन्ससह माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित आणि द्रविडला पदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. या मागणीवर बीसीसीआयच्या आज (21 डिसेंबर) होणाऱ्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या आज होणाऱ्या बैठकीत रोहित शर्माला टी-20 फॉरमॅटमधील कॅप्टन पदावरून हटवलं जाऊ शकतं, असा अंदाज व्यक्त होत आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रोहितच्या जागी टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या टी20 टीमचा कॅप्टन असेल. . टीम इंडिया पुढील टी-20 सीरिज मायदेशात श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. या सीरिजपासूनच पंड्याकडे टीमचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. बीसीसीआयच्या या बैठकीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. द्रविडच्या कोचिंगबद्दलही अनेक प्रश्न विचारण्यात आले असून द्रविडला जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय देखील घेतला जाण्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. जमत नसेल तर केळी, अंडी विका; कपिल देव क्रिकेटपटूंवर भडकले आजच्या बैठकीत सहभागी होणार असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत इनसाइडस्पोर्टनं वृत्त दिलं आहे की, बैठकीतील अजेंड्यावर अनेक विषय असतील. टी-20 वर्ल्ड कपचा आढावा हा अधिकृत अजेंडा नव्हता. पण, त्यावरही चर्चा व्हावी असं अध्यक्षांना वाटतं. त्यामुळे आता हाही महत्त्वाचा अजेंडा असेल. अधिकारी म्हणाला, “आम्हाला माहीत आहे की पुढील टी-20 वर्ल्ड कप दोन वर्षांनी होणार आहे. आपल्याला सध्या 2023 वन-डे वर्ल्ड कपवरही लक्ष केंद्रित करायचंय. त्यासाठी लवकर सुरुवात करावी लागेल. हा वर्ल्ड कप नवीन कॅप्टनच्या नेतृत्वाखाली असो किंवा रोहितच्या त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत.” याशिवाय बीसीसीआयला नवीन निवड समितीही नेमायची आहे. अशा परिस्थितीत आजच्या बैठकीत मोठे निर्णय होऊ शकतात. यासोबतच पुढील वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंसाठी नवा केंद्रीय करारही जाहीर केला जाऊ शकतो. नव्या केंद्रीय कराराच्या यादीतून कोण बाहेर जाऊ शकतं आणि कोणत्या नव्या खेळाडूला त्यात स्थान मिळू शकतं, याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मासह आणखी एक क्रिकेटर दुखापतीमुळे बाहेर दोन फॉर्मेटसाठी स्वतंत्र कॅप्टन आणि कोच, टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरीचा आढवा, सध्या सर्व प्रशिक्षकांची समीक्षा, निवड समिती सदस्यांची रोटेशन पॉलिसी आणि खेळाडूंसोबत करण्यात येणारे करार या मुद्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.