नवी दिल्ली, 02 जून : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यजमान देशाकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर आता टी-20 मालिका होणार आहे. पहिला T20 सामना 2 जुलै रोजी डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. पण, या सामन्यापूर्वीच बांगलादेशच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली. वास्तविक, पहिल्या T20 साठी बांगलादेशचा संघ सेंट लुसियाहून समुद्रमार्गे डॉमिनिकाला पोहोचला. हा पाच तासांचा प्रवास बांगलादेशी खेळाडूंसाठी वाईट अनुभव होता, कारण याआधी कोणत्याही बांगलादेशी खेळाडूने छोट्या फेरीत इतका लांबचा प्रवास केला नव्हता. सर्व खेळाडू डॉमिनिकाला पोहोचेपर्यंत बहुतेकांची प्रकृती खालावली होती. काही खेळाडू संपूर्ण मार्गात उलट्या करत (WI vs BAN 1st T20) राहिले.
बांग्लादेशी न्यूजपेपर प्रोथोम अलोने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना घेऊन जाणारी बोट समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच. तिता सामना उंच लाटांशी होऊ लागला. बांगलादेशी संघ ज्या बोटीत स्वार होता ती फार मोठी नव्हती. प्रवासात मध्यमभागी 6-7 फूट उंच लाटा फेयरी बीच समुद्रात उधळायला लागल्या. त्यामुळे खेळाडूंना उलट्या होऊ लागल्या. वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि यष्टिरक्षक फलंदाज नफीस इक्बाल यांना सर्वाधिक त्रास झाला. प्रवासादरम्यान या दोघांना अनेक वेळा उलट्या झाल्या.
बांगलादेशी खेळाडूंची अवस्था वाईट झाली -
बांगलादेशच नव्हे तर वेस्ट इंडिजच्या संघानेदेखील कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अशा पद्धतीनं एका बेटावरून दुसऱ्या बेटावर प्रवास केलेला नव्हता. बांगलादेशच्या एका क्रिकेटपटूने वृत्तपत्राशी बोलताना ही घटना सांगितली. तो म्हणाला की, एकेवेळ आपण मरतोय की काय, असे वाटत होते. आणखी एका क्रिकेटपटूने सांगितले की, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट दौरा होता.
हे वाचा -
Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी
हा खेळाडू पुढे म्हणाला, “या प्रवासात आम्ही आजारी पडून कदाचित मेलोही असतो. त्यांना याचं (वेस्ट इंडिज) काहीही पडलेलं नाही. आम्ही अनेक देशांचा प्रवास केला आहे. पण, असा अनुभव पहिल्यांदाच आला. आमच्यापैकी कोणत्याही खेळाडूला याची सवय नाही. खेळाबाबत बोलणं सोडूनच द्या, आमच्यापैकी एखादा खेळाडू गंभीर आजारी पडला असता तर काय झालं असतं. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दौरा आहे."
हे वाचा -
Rahul Dravid on Virat Kohli: 'विराटकडून मला शतक नको', निर्णायक टेस्टपूर्वी द्रविडनं केलं जाहीर!
बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 टी-20 मालिकेला शनिवारपासून (2 जुलै) सुरुवात होत आहे. पहिले दोन सामने डॉमिनिका आणि तिसरा गयाना येथे खेळवला जाईल. बांगलादेश संघाने यापूर्वीच कसोटी मालिका गमावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.