नवी दिल्ली, 2 डिसेंबर: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्विवार्षिक ऍशेस सिरीजला(AUS vs ENG Ashes Series) सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. पण, गेल्या काही दिवसात टिम पेनची(Tim Paine) माघार आणि नेतृत्त्वातील बदल यामुळे 15 जणांच्या संघात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला काही बदल करावे लागले आहेत. बदल करण्यात आलेल्या संघात नवखा विकेटकीपर अॅलेक्स कॅरी (Alex Carey) याला स्थान देण्यात आले आहे. म्हणजेच तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणार आहे.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा नियमिक कसोटी यष्टीरक्षक टिम पेनने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे.
त्याच्या जागी आता यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरे या मालिकेतून कसोटीत पदार्पण करणार आहे. त्याला टिम पेनच्या ऐवजी संघात विकेटकीपर फलंदाज म्हणून जागा मिळेल. असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
पेनच्या माघारीने कॅरेच्या पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅरे ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणारा ४६१ वा खेळाडू ठरणार आहे.
कॅरीने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय आणि टी-20 पदार्पण केले. तेव्हापासून तो कांगारू संघासाठी 45 एकदिवसीय आणि 38 टी-२० सामने खेळला आहे. म्हणजेच एकूण 83 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले, "मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अॅलेक्स दीर्घकाळ राष्ट्रीय संघाचा भाग आहे. विशेषत: एकदिवसीय संघासाठी. तो एक महान क्रिकेटर आणि माणूस आहे, जो संघाची ताकद वाढवेल. तो ऑस्ट्रेलियन कसोटी संघात स्थान घेण्यास पात्र आहे.”
बेलीने सांगितले की, अॅलेक्स कॅरी हा ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण करणारा 461 वा खेळाडू असेल. कॅरीने गेल्या दोन हंगामात ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत शेफिल्ड शिल्डमध्ये सरासरी 50 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड झाल्याबद्दल कॅरी म्हणाला, “या संधीसाठी मी खरोखर आभारी आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी हे उत्साहवर्धक आहे. माझे संपूर्ण लक्ष ऑस्ट्रेलियाला ऍशेस मालिका जिंकण्यात मी कसे योगदान देऊ शकेन यावर आहे. देशाला अभिमान वाटावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन."
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी 16 ते 20 डिसेंबर दरम्यान अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. शेवटची अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ (उपकर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, मार्कस हॅरिस, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्कस लॅब्यूशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, मिशेल स्टार्क, मिशेल स्विप्सन, डेविड वॉर्नर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Australia, Test cricket, Test series