VIDEO : 'चौकार मारला तरी दिली नाही एकही धाव', स्मिथने पंचांशी हुज्जत घालताच प्रेक्षक भडकले

VIDEO : 'चौकार मारला तरी दिली नाही एकही धाव', स्मिथने पंचांशी हुज्जत घालताच प्रेक्षक भडकले

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला दोन वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

  • Share this:

जोहान्सबर्ग, 22 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला दोन वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर प्रेक्षक त्याच्यावर पुन्हा एकदा भडकले. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात स्मिथला सुरुवातीपासून प्रेक्षकांनी डिवचलं.

दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय गेतला. ऑस्ट्रेलियानं 196 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आफ्रिकेचा संघ 89 धावाच करू शकला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांनी जोरदार गोंधळ केला. डेल स्टेन गोलंदाजी करत असताना त्याच्या हातून चेंडू निसटला. डेड बॉल असतानाही स्मिथने चौकार लगावला पण पंचांनी एकही धाव दिली नाही. धाव न दिल्यानं त्यानं  पंचांशी हुज्जतही घातली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या प्रेक्षकांनी जास्तच गोंधळ घातला.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवी डेव्हिड वॉर्नर फक्त 4 धावा काढून बाद झाला होता. त्यानंतर स्मिथ फटकेबाजीच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. त्यामुळे डेड बॉलवरही त्यानं जोरात फटका मारला. डावाच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा प्रकार घडला.

ऑस्ट्रेलियाकडून फिंचने 42 आणि स्मिथने 45 धावा केल्या. त्याशिवाय अॅगरने शेवटच्या षटकात 9 चेंडूत 20 धावांची फटकेबाजी केली. आफ्रिकेच्या डेल स्टेन आणि तबरेझ शाम्सी यांनी प्रत्येकी दोन तर लुंगी एनगिडी आणि अँडीली फेहलुक्वायो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

वाचा : फॉर्ममध्ये नाही तरी कोहलीनं रचला अनोखा विक्रम, सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान

दक्षिण आफ्रिकेच्या डुप्लेसी, बिलजोन आणि रबाडा वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या अॅगरच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेची दाणादाण उडाली. अॅगरने 24 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय कमिन्स आणि झाम्पा यांनी प्रत्येकी दोन तर स्टार्कने एक गडी बाद केला.

वाचा : धोनीला निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडलं जातंय? गांगुलीने खास सामन्यातून वगळलं

First published: February 22, 2020, 7:44 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading