मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नरचं वादळ, द्विशतक झळकावत केले अनेक विक्रम

बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नरचं वादळ, द्विशतक झळकावत केले अनेक विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने द्विशतक झळकावलं आहे. कसोटी कारकिर्दीतील वॉर्नरचा हा 100 वा सामना असून हा क्षण त्याच्या द्विशतकाने अविस्मरणीय ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने द्विशतक झळकावलं आहे. कसोटी कारकिर्दीतील वॉर्नरचा हा 100 वा सामना असून हा क्षण त्याच्या द्विशतकाने अविस्मरणीय ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने द्विशतक झळकावलं आहे. कसोटी कारकिर्दीतील वॉर्नरचा हा 100 वा सामना असून हा क्षण त्याच्या द्विशतकाने अविस्मरणीय ठरला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेलबर्न, 27 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावलं आहे. सोमवारी वॉर्नर 32 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानतंर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने 254 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 200 धावा केल्या. वॉर्नर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून परतला. वॉर्नरचं हे दुसरं द्विशतक असून याआधी एक त्रिशतकही त्याने केलं आहे.

कसोटी कारकिर्दीतील वॉर्नरचा हा १०० वा सामना असून हा क्षण त्याच्या द्विशतकाने अविस्मरणीय ठरला आहे. १०० व्या कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन तर जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे. वॉर्नरच्या आधी अशी कामगिरी इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने केली होती. वॉर्नरशिवाय ऑस्ट्रेलियाकडून १०० व्या कसोटीत शतक फक्त रिकी पाँटिंगने केलं आहे.

हेही वाचा : कोचने बक्षीसाची अर्धी रक्कम न दिल्याने हरवलं, आत्महत्येशिवाय पर्याय नाही, राष्ट्रीय प्लेअरची व्यथा

फक्त कसोटीतच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही 100 व्या सामन्यात वॉर्नरने शतक केलं होतं. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजच्या नावावर आहे.

गेल्या तीन वर्षांपासून डेव्हिड वॉर्नरला कसोटीत चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला होता. आता 3 वर्षानंतर त्याने 100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी जानेवारी 2020 मध्ये वॉर्नरने शतक केलं होतं. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 8 हजार धावा करणारा तो 8वा फलंदाज आहे.

हेही वाचा : IPL 2023च्या आयोजनात ICCच्या नियमाचा अडथळा, BCCIसमोर तयारीचा पेच

माजी दिग्गज सलामीवीरांच्या पंक्तीत वॉर्नर जाऊन बसला आहे. 25 कसोटी शतके करणारा तो पाचवा सलामीवीर बनला आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर हे असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत 33 शतके झळकावली. त्यांच्यानंतर इंग्लंडचा अॅलिस्टर कूक (31), ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन (30) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ (27) यांचा नंबर लागतो.

First published:

Tags: Australia, Cricket, South africa