VIDEO : क्रिकेटच्या मैदानात खेळाडू खेळायला लागला फुटबॉल, चेंडू थेट बाउंड्री पार!

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात खेळाडू खेळायला लागला फुटबॉल, चेंडू थेट बाउंड्री पार!

अरेरे! पाकच्या गोलंदाजाची स्टाईल पडली महागात.

  • Share this:

ॲडलेड, 30 नोव्हेंबर : पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा दुसरा कसोटी सामना अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. मुख्य म्हणजे हा कसोटी सामना डे-नाईट खेळवला जात आहे, त्यामुळं गुलाबी चेंडूनं पाकच्या गोलंदाजांची दमछाक होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तान संघाचे क्षेत्ररक्षण फारच खराब झाले. क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दोनदा निष्काळजीपणा दाखवला. शाहीननं केलेला प्रकार हा लाजीरवाणआ होता. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर शाहीनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा-‘तेरा ध्यान किधर है?’, डोळ्यासमोर चेंडू पण नजर भलतीकडे; पाक खेळाडूचा VIDEO VIRAL

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याच्या चुकीच्या फील्डिंगचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. एकात शाहीन आफ्रिदीला चेंडू दिसला नाही आणि तो चुकण्याच्या दिशेने पळाला. चेंडू सीमेबाहेर गेला आणि ऑस्ट्रेलियाने खात्यात चार धावा जोडल्या. आणखी एक घटना घडली ज्यामध्ये शाहीन त्याच्या पायाने चेंडू मारल्यानंतर चौकार ओलांडून बसला. हे दोन्ही व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले गेले आहेत.

वाचा-VIDEO : मित्र झाले वैरी! पहाटे 4 वाजता पोलार्डनं उडवली रोहितची झोप

वाचा-श्रेयस अय्यरचा ‘धोनी’ अवतार! हेलिकॉप्टर शॉटचा VIDEO VIRAL

या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. वॉर्नर आणि लॅबशॅन या दोघांनी आपले शतक पूर्ण केले आहे. ऐवढेच नाही तर दोघांनी 294 धावांची भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यातील ही सर्वेश्रेष्ठ भागीदारी आहे. पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर पाक संघानं दुसऱ्या सामन्यात मोठे बदल केले आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 1 विकेट गमावत 302 धावा केल्या आहेत. सध्या वॉर्नर 166 तर, लॅबशॅन 126 धावांवर खेळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2019 11:14 AM IST

ताज्या बातम्या