मुंबई, 15 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर आता चायनिज कंपनी ओप्पोचा लोगो दिसणार नाही. त्याच्या जागी बायजू या भारतीय कंपनीचा लोगो यापुढं असेल. भारत (India) आणि दक्षिण आफ्रीका (South Africa)यांच्यात धर्मशाला (Dharamshala) मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया नव्या स्पॉन्सरच्या जर्सीत उतरणार आहे. पहिल्या टी20 सामन्यापूर्वी सरावावेळी टीम इंडिया नव्या जर्सीत दिसली. ओप्पोने टीम इंडियाचा स्पॉन्सर म्हणून 5 वर्षांचा करार केला होता. मात्र, करार अर्ध्यात रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. त्यानंतर बायजूने स्पॉन्सरशिप घेतली. 2017 मध्ये ओप्पोनं टीम इंडियाच्या जर्सीवर टायटल स्पॉन्सरचे अधिकार 1 हजार 79 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आतापर्यंतचा सर्वात मोठा करार होता. मात्र, ओप्पोला आपण गरजेपेक्षा जास्त पैसे दिले असं वाटल्यानं त्यांनी करार रद्द केला. आता बायजू ओप्पोकडून जितकी रक्कम दिली जात होती तेवढीच रक्कम बीसीसीआयला देणार आहे. हा करार 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. ओप्पो प्रत्येक द्विपक्षीय मालिकेसाठी प्रत्येक सामन्याला बीसीसीआयला 4.6 कोटी रुपये देत होती. आयसीसी आणि आशिया कप सामन्यांसाठी कंपनी प्रत्येक सामन्यासाठी 1.92 कोटी रुपये मोजत होती. आता हे पैसे बायजू कंपनी देणार आहे. स्टार इंडिया याआधी जर्सीवर नावासाठी बीसीसीआयला द्विपक्षीय मालिकेतील सामन्यासाठी फक्त 1.92 कोटी रुपये देत होती. याशिवाय आयसीसी आणि आशिया कपच्या सामन्यासाठी 61 लाख रुपये द्यावे लागत होते. ओप्पोनं मोठी रक्कम देऊन स्पॉन्सरशिप घेतली होती. बायजू ही एज्युकेशन सेक्टरशी संबंधित कंपनी आहे. ऑनलाइन शिक्षण आणि क्लासोससाठी बायजू प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी वेगानं लोकप्रियता मिळवली आहे. BYJU’S ला रवींद्रन यांनी उभा केलं होतं. या वर्षीच कंपनीने अमेरिकनं कंपनी OSMO खरेदी केली होती. कंपनीला ऑनलाइन कोचिंगच्या माध्यमातून वर्षाला 260 कोटी रुपये मिळतात. शाहरुख खान कंपनीचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. याशिवाय कंपनीने डीझनीने पैसे लावले आहेत. पुढच्या तीन वर्षात कंपनीला त्यांचे उत्पन्न 260 कोटींवरून 3250 कोटी रुपयांपर्यंत पोहचवायचं आहे. VIDEO: अनधिकृत होर्डिंग्ज पुणेकरांना मनस्ताप; वाहतूक कोंडीत अॅम्ब्युलन्स अडकली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.