जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PAK vs AUS 2022: पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर

PAK vs AUS 2022: पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर

PAK vs AUS 2022

PAK vs AUS 2022

पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour of Pakistan) तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाच्या 18 खेळाडूंचा संघ घोषित करण्यात आला आहे. 24 वर्षात दोन्ही संघ पाकिस्तानच्या भूमीवर एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour of Pakistan) तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाच्या 18 खेळाडूंचा संघ घोषित करण्यात आला आहे. 24 वर्षात दोन्ही संघ पाकिस्तानच्या भूमीवर एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. 4 ते 25 मार्च दरम्यान दोन्ही संघात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत तीन सामन्यांची सिरीज खेळण्यात येणार आहे. 1998 नंतर तब्बल 24 वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानात खेळताना दिसेल. 4 मार्चपासून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि एकमेव टी-20 सामन्याचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18-सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडचे (Josh Hazlewood) पुनरागमन झाले आहे. तर डावखुरा फिरकी गोलंदाज अ‍ॅश्टन अगरचा (Ashton Agar) अतिरिक्त संथ गोलंदाजीचा पर्याय म्हणून समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी संघाची कमान हाती घेतलेला पॅट कमिन्स पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल.

जाहिरात

रावळपिंडीच्या मैदानातील कसोटी सामन्याने ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान ( Australia and Pakistan) दौऱ्याची सुरुवात होईल. दुसरा कसोटी सामना कराची आणि तिसरा कसोटी सामना लाहोरच्या मैदानात नियोजित आहे. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा पाच एप्रिल रोजी संपणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक 4 मार्च ते 8 मार्च - पहिला कसोटी सामना, रावळपिंडी 12 मार्च ते16 मार्च - दूसरा कसोटी सामना, कराची 21मारच ते 25 मार्च - तीसरा कसोटी सामना, लाहोर 29 मार्च - पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी 31 मार्च - दूसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी 2 एप्रिल - तीसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी 5 एप्रिल - टी20 सामना, रावळपिंडी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात