मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, भारतासह ९ देशांनाही जमली नाही अशी कामगिरी

पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, भारतासह ९ देशांनाही जमली नाही अशी कामगिरी

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यात 419 धावांनी धूळ चारत ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात टाकली. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 164 धावांनी विजय मिळवला होता.

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यात 419 धावांनी धूळ चारत ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात टाकली. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 164 धावांनी विजय मिळवला होता.

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यात 419 धावांनी धूळ चारत ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात टाकली. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 164 धावांनी विजय मिळवला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

एडलेड, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध पिंक बॉल (डे नाइट) कसोटीत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यात 419 धावांनी धूळ चारत ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात टाकली. कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने कोणत्याही संघाने मिळवलेला हा नववा मोठा विजय आहे. तर वेस्ट इंडिजसाठी इतक्या धावांनी झालेला सर्वात मोठा पराभव आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 164 धावांनी विजय मिळवला होता.

डे नाइट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा हा अकरावा विजय आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत जितके डे नाइट कसोटी सामने खेळलेत त्यात विजय मिळवला. डे नाइट कसोटीत त्यांच्या 100 टक्के विजयाची सरासरीचा विक्रम कायम आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय कसोटी खेळणाऱ्या इतर 9 देशांना मिळूनही डे नाइट कसोटीत ऑस्ट्रेलिया इतके सामने जिंकता आलेले नाहीत.

हेही वाचा : बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा बाहेर

भारत, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बॉब्वे या देशांनी मिळून आतापर्यंत 9 पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियानंतर सर्वाधिक पिंक बॉल कसोटी जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने 4 पिंक बॉल कसोटी खेळल्या असून त्यात तीन वेळा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकमेव पिंक बॉल कसोटी भारताने गमावली आहे.

श्रीलंकेने दोन, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने एका पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला आहे. तर बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वेला अद्याप एकाही पिंक बॉल कसोटीत विजय मिळवता आलेला नाही. आतापर्यंत 20 पिंक बॉल कसोटी सामने झाले असून यात 18 वेळा यजमानांनी विजय मिळवला आहे तर फक्त दोन वेळा पाहुण्या संघाने सामने जिंकले आहेत.

First published:

Tags: Australia, Cricket, West indies