मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सानिया-शोएबचा घटस्फोट झालाय? सानियाच्या नव्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा चर्चा

सानिया-शोएबचा घटस्फोट झालाय? सानियाच्या नव्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा चर्चा

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं लग्न 2010 मध्ये झालं. त्यांना इजहान मिर्झा मलिक नावाचा छोटा मुलगाही आहे; मात्र गेले काही दिवस त्यांच्या घटस्फोटाची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरू आहे. त्यातच सानियाच्या इन्स्टाग्राम पोस्टने..

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून भारताची बॅडमिंटनपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यातच आता सानिया मिर्झाने वेगळा संदेश देणारी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून त्यात भर घातलीय. 'स्वतःवर काही दडपण आलं, भावनिकदृष्ट्या अस्वस्थ वाटलं, स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा' अशा आशयाचा मजकूर तिने लिहिला आहे. त्यामुळे सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. आज तकने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं लग्न 2010 मध्ये झालं. त्यांना इजहान मिर्झा मलिक नावाचा छोटा मुलगाही आहे; मात्र गेले काही दिवस त्यांच्या घटस्फोटाची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरू आहे. काही पाकिस्तानी माध्यमांनी तर त्यांचा अधिकृतरीत्या तलाक झाला असल्याचं वृत्त दिलं व ते दोघं वेगळे राहत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर भारतातही या चर्चांना उधाण आलं; मात्र अद्याप सानिया व शोएब दोघांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

त्यातच आता सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. तिनं सी. आर. एलियट यांचा एक कोट शेअर केलाय. ‘माणूस प्रकाश आणि अंधाराच्या मीलनातून तयार झालेला असतो. भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असलात, तर स्वतःवर प्रेम करा. कधी दडपण आलं, तर स्वतःला वेळ द्या,’ असा तो कोट आहे.

सानिया मिर्झाची इन्स्टाग्राम पोस्ट

सानिया मिर्झाची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, सानिया आणि शोएब यांचा एक टॉक शो पाकिस्तानी चॅनेलवर लवकरच येणार आहे. त्या चॅनेलने दोघांचा फोटो असलेलं एक पोस्टरही शेअर केलं होतं. ‘मिर्झा मलिक शो’ असं या शोचं नाव असेल. तसंच काही दिवसांपूर्वी 15 नोव्हेंबरला सानियाचा 36वा वाढदिवस झाला. त्या वेळी शोएबने दोघांचा फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, सानिया मिर्झा. तुला सुखी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही इच्छा. तुझा दिवस आनंदात जावो,’ अशा शुभेच्छा शोएबने दिल्या होत्या. या दोन्ही वृत्तांमुळे घटस्फोटाच्या चर्चांना काही काळ विराम मिळाला होता; मात्र सानियाच्या नव्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झालीय. कदाचित नव्या टॉक शोसाठीची ही वातावरणनिर्मिती असू शकते. हा टॉक शो सुरू झाल्यावरच घटस्फोटाच्या बातमीतलं सत्य समोर येऊ शकेल. सानिया व शोएब दोघांनीही अद्याप घटस्फोटाच्या चर्चांबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे अजूनही चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

First published:

Tags: Pakistani, Sania mirza