मुंबई, 13 जानेवारी : सानिया मिर्झा पुढच्या महिन्यात दुबई मास्टर्स स्पर्धेनंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार होती. दरम्यान आता सानियाने एक महिना आधीच निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही महिन्यांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. त्यातच आता सानिया मिर्झाने Life Update असं म्हणत तिच्या टेनिसमधील निवृत्तीबाबत पोस्ट केली आहे. यात सानियाने तिच्या अखेरच्या ग्रँड स्लॅम आधी एक भावुक करणाऱ्या आठवणी लिहिल्या आहेत. या पोस्टमध्ये सानिया मिर्झाने आपल्या टेनिसमधील कारकिर्दीबद्दल लिहिलं आहे. सानियाने याआधीच आपल्या निवृत्तीबाबत जाहीर केलं आहे. मात्र आता भावनिक अशी पोस्ट करत पुन्हा एकदा चाहत्यांना भावुक केलं आहे. आपल्या टेनिसमधील कारकिर्दीला सुरुवात झाल्याची आठवण सांगताना सानियाने म्हटलं की, 30 वर्षांपूर्वी हो 30 वर्षांपूर्वी हैदराबादच्या शाळेतली एक सहा वर्षांची मुलगी आईसोबत निजाम क्लबच्या टेनिस कोर्टमध्ये गेली होती. टेनिसचे धडे देण्यासाठी ती प्रशिक्षकांसोबतही लढली. प्रशिक्षकांना ती लहान असल्याचं वाटलं. पण स्वप्नांसाठी लढाई वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाली होती.
सानिया मिर्झाने पोस्टमध्ये लिहिलंय की, “माझं ग्रँड स्लॅम करिअर 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमधून सुरू झालं होतं. यामुळे इतर काही न बोलता हे स्पष्ट आहे की माझ्या करिअरचा शेवट करण्यासाठी हेच योग्य ग्रँड स्लॅम असेल.” सानिया मिर्झा ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये अखेरची खेळणार आहे. हेही वाचा : जडेजाचा रोख नेमका कुणाकडे? पाच शब्दांच्या ट्विटची होतेय चर्चा मी जेव्हा पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ओपन खेळल्यानंतर आज 18 वर्षांनी अखेरची ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी तयार होत आहे तेव्हा माझ्या मनात अभिमान आणि कृतज्ञतेसह सर्व भावना आहेत. बहुतेक सर्वात खास नातं असल्याने असावं. गेल्या 20 वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत सर्व काही मिळवल्यानं अभिमान आहे आणि त्या सर्व आठवणींसाठी खूप आभारी आहे ज्या मी निर्माण करण्यासाठी सक्षम झाली आहे. आयुष्यभर माझ्या सोबत असलेली सर्वात मोठी आठवण, अभिमान आणि आनंद तो आहे जो मी माझ्या देशवासियांच्या आणि समर्थकांच्या चेहऱ्यावर पाहिला. जेव्हा मी विजय मिळवला आणि मोठ्या कारकिर्दीत माइलस्टोन गाठला असं सानिया म्हणाली. सानिया मिर्झाने महिला आणि मिश्र दुहेरीत सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. याआधी सानिया मिर्झा 2022 च्या अखेरीस निवृत्ती घेणार होती. पण दुखापतीमुळे तिला अमेरिकन ओपनमधून बाहेर पडावं लागलं होतं.