नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : IPL 2021 कोरोनामुळे ब्रेक के बाद सुरू झाली. सुरुवातीच्या आठवड्यात रंगत फारशी चढत नाही असं वाटत असतानाच आता सामने रंगतदार व्हायला लागले आहेत. मैदानावर खेळाबरोबरच इतरही काही गोष्टींमुळे चर्चा वाढत आहेत. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) संघाने यंदाचे आयपीएल मैदान चांगलेच गाजवले असल्याचे पाहायला मिळाले आहे. दोन्ही संघातील खेळाडू आपापसात भिडले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
आर अश्विन (R Ashwin) याला केकेआरचा गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) आउट केल्यानंतर छेड काढली. तो काहीतरी पुटपुटताना दिसला. त्यावरुन आर अश्विन भडकला आणि त्यानेदेखील प्रत्युत्तर दिले. दोघांच्या भांडणात केकेआरचा कर्णधार ऑएन मॉर्गनेदेखील उडी मारली.
दोघांच्या भांडणात दिनेश कार्तिकने भाग घेत अश्विनला शांत करत पॅवेलियनमध्ये पाठवले. या दरम्यान, झालेला वाद शांत करण्यासाठी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि कार्तिक यांच्यात काही चर्चा झाली. अश्विन नऊ धावा काढून बाद झाला होता.
Nicepic.twitter.com/CQrOhdv8cG
— Aryan (@Kohlis_shadow) September 28, 2021
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या अखेरच्या षटकात ही घटना घडली. हे षटक टीम साऊदीने टाकले होते. सौदीने संथ चेंडू टाकला. यावर अश्विन क्रीजच्या बाहेर आला आणि त्याने पुल शॉट खेळला. चेंडू हवेत गेला आणि डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या नितीश राणाने झेल घेतला.
दरम्यान, धावा घेताना सौदीने अश्विनला काहीतरी सांगितले. अश्विन हे पाहून चिडलेला दिसला आणि त्यानेही मागे वळून काहीतरी सांगितले. तोपर्यंत केकेआरचा कर्णधार मॉर्गनही तिथे आला आणि त्यानेही काहीतरी सांगितले. तोही अश्विनसोबत गोंधळून गेला. अशा स्थितीत पंच, कार्तिक आणि पंत यांनी वातावरण शांत केले. नंतर अश्विन पॅव्हेलियनमध्ये परतला.
सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.