नवी दिल्ली, 4 जानेवारी: आगामी आयपीएल (IPL 2022) हंगामासाठी नव्याने मैदानात उतरलेल्या अहमदाबाद संघाने (Ahmedabad IPL franchise)जेतेपद पटकवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराची (Ashish Nehra) या नव्या संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी या संघाचे क्रिकेट संचालक हे पद सांभाळतील.
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दक्षिण आफ्रिकन गॅरी कस्र्टन(Gary Kirsten) हे या संघाचे मेटॉरची भूमिका सांभळतील असे सांगण्यात येत आहे.
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये 10 संघ उतरणार आहेत. 2 नवे संघ लखनऊ आणि अहमदाबाद काही दिवसांपूर्वी टी20 लीग मध्ये सहभागी झाले आहेत. तसेच, 27 खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या संघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नसून या संघांना फेब्रुवारीत होणाऱ्या लिलावप्रक्रियेपूर्वी प्रत्येकी तीन खेळाडूंना निवडण्याची संधी आहे. नेहराने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला मार्गदर्शन केले असून कस्र्टन यांनाही आयपीएल मध्ये प्रशिक्षणाचा अनुभव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2021 auction, Ipl 2022