मुंबई, 9 सप्टेंबर- आशिया चषक 2022 मध्ये काल भारतानं अफगाणिस्तानविरोधात सुपर फोर फेरीतली औपचारिक लढत 101 धावांनी जिंकत विजयाचा झेंडा फडकवला. सोबतच विराटने आपल्या शतकाचा दुष्काळही संपवला. 2019 मध्ये विराटने अखेरचं शतक केलं होतं. त्यानंतर त्याला शतक करता आलं नव्हतं. त्याच्या या तुफानी खेळीसाठी चाहते आतुर झाले होते. कालच्या सामन्यात विराटने 61 चेंडूत नाबाद 122 धावा करत सर्वांनाच थक्क केलं. यासोबतच विराटने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपलं 71 वं शतक पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान आता विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने एक पोस्ट लिहत आनंद व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. फक्त देशातच नव्हे तर जगभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर या दोघांना फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. अशातच चाहते या दोघांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. आजही अभिनेत्रींच्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. पाहूया काय आहे अनुष्काची पोस्ट. अनुष्का शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते. आपला पती आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या शतकानंतर अभिनेत्रीने विराटाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहली आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘कोणत्याही आणि प्रत्येक गोष्टींमध्ये मी नेहमी तुझ्यासोबत आहे’. असं म्हणत अनुष्काने आपलं प्रेम आणि आनंद व्यक्त केला आहे.
**(हे वाचा:** महाकाल मंदिरात विरोधानंतर रणबीर पोहोचला लालबागच्या राजाच्या चरणी; समोर आला VIDEO ) अनुष्का शर्मा झाली होती ट्रोल- गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली मैदानावर खराब कामगिरी करत होता. अशातच त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर त्याच्यासोबत पत्नी अनुष्कालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. विराटच्या खराब कामगिरीला अनेकांनी अनुष्काला जबाबदार धरत तिला वाईटरित्या ट्रोल केलं होतं.